अरुणा ईराणी यांनी मूल जन्माला न घालण्याचा घेतला होता निर्णय!!

0
736
अरुणा-ईराणी-news-bollywood-marathitrends-latest

प्रसिद्ध हिंदी चित्रपट सृष्टीतील व्हिलन अरुणा ईराणी यांनी केले होते स्वतःच्या चित्रपटातील डायरेक्ट सोबत लग्न!! मूल जन्माला न घालण्याचा घेतला होता निर्णय!!

 

बॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाची भूमिका केलेली अरुणा इराणी या एकेकाळच्या सुपरहिट चित्रपटांच्या खलनायकांच्या रुपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. त्यांनी रंगवलेली प्रत्येक पात्र सुपरहिट झाले आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अरुणा इराणी यांनी आपले हिंदी चित्रपट सृष्टीतील जवळपास साठ वर्षाच्या करियरमध्ये चित्रपटांमध्ये व्हिलन भूमिकेने केले आहे.

 

नव्वदच्या दशकामध्ये आया सावन झुम के, अौलाद, हमजोली, नया जमाना, बेटा, फर्ज, बॉबी, सरगम, रॉकी, फकिरा,लव्ह स्टोरी इत्यादी 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अरुणा इराणी यांनी काम केले आहे. त्यांच्या अनेक निगेटिव्ह भूमिका सुपरहीट झाल्या आहेत. कोणताही चित्रपट असला तरी फिमेल विलन ऍक्टर म्हणून अरुणा इराणी याच सगळीकडे पाहायला मिळायच्या. असे असले तरी अरुणा इराणी यांचा फॅन-फॉलोवर क्लब खूप मोठा आहे आणि लोकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात.

 

नव्वदच्या दशकात आपल्या चित्रपटातील निर्देशक असलेल्या कुक्कु कोहली यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर अरुणा इराणी मिडियामध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. 18 ऑगस्ट 1946 रोजी मुंबईमध्ये जन्म झालेल्या अरुणा इराणी यांच्या घरी खूप गरिबी होती. आईवडील व आपल्या आठ भावंडांसह अरुणा इराणी गरिबीमध्ये जीवन व्यतीत करत होत्या. 1984 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना चित्रपट सृष्टी मध्ये काम मिळाले व पोटाची भूक व घरच्यांना आर्थिक हातभार लावण्याकरता अरुणा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरवात केली.

 

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या मेहमूद यांच्यासोबत देखील अरुणा इराणी यांचे नाव जोडले गेले होते. असेही म्हटले जात होते की मेहमूद व अरुणा इराणी यांनी गुपचूप विवाह केला होता! मीडिया सोबत दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा अरुणा इराणी यांना मेहमूद बद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी या गोष्टी करता साफ नकार दिला की त्यांनी लग्न वगैरे काही केले नव्हते, त्यांनी स्वतः सांगितले की मेहमूद व अरुणा एकमेकांचे चांगले मित्र होते. पण त्यांचे नाते मैत्रीपेक्षा जास्त घट्ट होते.

 

1990 च्या दशकामध्ये वयाच्या 44 व्या वर्षी अरुणा इराणी यांनी त्यांच्या फिल्म निर्देशक असलेल्या कुक्कु कोहली यांच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर अरुणा इराणी यांनी कधीही मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल विचारणा केली असता अरुणा इराणी यांनी सांगितले की लग्नानंतर त्या जेव्हा डॉक्टर कडे गेल्या तेव्हा डॉक्टरने सांगितले की आता मूल जन्माला घातले तर मुलांमध्ये व त्यांच्यामध्ये खूप मोठा जनरेशन गॅप निर्माण होईल व डॉक्टरचा सल्ला त्यांना पटला व त्यांनी आयुष्यात परत कधीही पूर्ण होऊ न द्यायचा निर्णय घेतला.

 

कुक्कु कोहली यांच्या सोबत लग्न केले तेव्हा कुक्कु कोहमी  हे अगोदर विवाहित होते व त्यांना पहिल्या विवाहातून मुले देखील होती, असे असताना देखील अरुणा इराणी यांनी कुक्कु कोहलींसोबत लग्न केले व संसार करत आहेत. वैयक्तिक जीवनामध्ये अरुणा इराणी खूपच प्रेमळ व मायाळू आहेत. चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका हीट असली तरी वैयक्तिक आयुष्यात अरूणा खुपच प्रेमळ आहेत!

Leave a Reply