करीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का? मग करा हे उपाय…! २ आठवड्यात होतील गोल गुटगुटीत गाल…!

0
809
Skin Tips
kareena-beauty-fairness-tips-marathi-beauty-tips-in-marathi-healthy-skin-fair-skin-secret-tips

कोणत्याही व्यक्तिच्या ‍सौंदर्याचा भाग म्हणजे आकर्षक चेहरा व हसताना गोलमटोल दिसणारे गोबरे गोबरे गुलाबी गाल!!  स्त्रियांचे गोबरे गाल आणि त्यावर गुलाबी चमक ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते.  गोबरे गाल आकर्षणाचा व कौतुकाचा विषय बनते. पण काही लोकांचे गाल एकदमच कमी किंवा चपटे असतात. त्यामुळे त्या व्यक्ती कायम आजारी व अशक्त वाटतात.

चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे व्यक्तिमत्त्वात भर पडत असते व गुटगुटीत गाल असले तर चांगले इम्प्रेशन पडते. ज्यांचे गाल खूपच कमी असतात किंवा अजिबातच नसतात अशा लोकांचा चेहरा अतिशय निरास व खराब दिसतो. एखाद्या फुग्यातून हवा काढून घेतल्या सारखे गाल चिपटे दिसतात. गालांची सौंदर्य वाढवण्याकरता लोक अनेक उपाय करतात पण त्याचा  काहीच फायदा मिळत नाही.

आज आम्ही ह्या लेखाद्वारे आपल्याला चपटे गाल अगदी गुटगुटीत गोल व गोबरे होण्याकरता आवश्यक शास्त्रशुद्ध व योग्य व्यायामांबद्दल माहिती देणार आहोत! त्याद्वारे चपटे गाल गुटगुटीत व गोबरे गुबगुबित होतील.

 

१.फेशियल योगा-

फेशियल योगा केल्याने चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय त्वचेचा आतील रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रवाहीत होतात व स्नायुंना उभार मिळतो व त्यामुळे त्वचेवरील सर्व दोष जसे पिंपल्स, मुरूम,  काळे डाग फेशियल योगा केल्याने निघुन जातात. चेहरा उजळतो व चमकदार बनतो!

पद्धत – आपल्या हाताच्या बोटांनी  चीकबोन्सवर हलका मसाज करत राहावे तसेच तसेच नाकापासून कानापर्यंत व जबड्याला ही मसाज द्यावा त्यामुळे त्वचेच्या आतील रक्तवाहिन्या व स्नायु अॅक्टीवेट होतात व त्यांना मसाज मिळाल्यामुळे टोनिंग येते व काही दिवसांमध्येच आपले चिपटे गाल वरती येण्यासाठी सुरुवात होते.  बोटांनी आपल्या पूर्ण जबड्याची मालिश केल्यास गालाच्या स्नायुमध्ये कसाव येतो.  ढिलेपणा जाऊन गाल गोबरे होतात.

२.गोबऱ्या गालांकरता खुर्ची मसाज:-
खुर्चीत सरळ बसून आपण कोणाशी बोलत आहोत अशाप्रकारे ओठांची हालचाल करा व अोठ आतल्या बाजूने खेचा. अोठ आतून खेचल्यामुळे आपले गाल  ही आतून घेतले जातात व त्यामुळे गालांचा व्यायाम होतो. ह्या अवस्थेत एक मिनिट बसावे, असा व्यायाम रोज तीन वेळेस करावा.

३. मोठा श्वास घेऊन संपूर्ण हवा तोंडामध्ये जमा करा व तोंड दाबून ठेवा 40 ते 50 सेकंद अशाप्रकारे तोंडामध्ये हवा दाबून धरावी. त्यामुळे गालं फुगतील व गालाच्या स्नायूंवर ताण येईल व गालांचा व्यायाम होईल.

४. आपण हसताना आपले जे स्नायू अोढले किंवा खेचले जातात, त्या स्नायूंना मसाज द्या त्यामुळे आपले हास्यसौंदर्य देखील वाढते आणि त्यावरील तणाव जाऊन गाल फुगण्यास मदत होते.

५.आपल्या ओठांना पूर्णपणे बंद करून अोठांना आवळुन घ्यावे. गालातल्या गालात मोठ्याने हसायचा प्रयत्न करा. असे दहा सेकंद हा त्यामुळे आपल्या तोंडामध्ये व्हायब्रेशन निर्माण होते व त्यामुळे गालांचा मसाज होतो व गाल गोबरे होण्यास मदत होते.

Leave a Reply