जाणून घ्या का झाला होता सुपरस्टार अमिताभ बच्चनचा Breakup ?

0
772
जाणून घ्या का झाला सुपर स्टार अमिताभ बच्चनचा Breakup
amitabh-bacchan-rekha-jaya-bacchan-abhishek-bacchan-family-brekup-story-love-story-

रेखा यांना जेवणासाठी घरी बोलवून जेव्हा जया असे काही म्हणाल्या होत्या ज्यामुळे झाला होता ब्रेकअप

बॉलीवूड मध्ये गाजलेली सर्वात जास्त फेमस प्रेम जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा ‘ दो अनजाने’  या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही समजले नाही. या जोडीच्या शूटिंगदरम्यान अभिनयातूनही असे दिसते की हे दोघे ॲक्टिंग करत नसून चक्क एकमेकांवर खरंच प्रेम करत आहेत. amitabh-_rekha-_jaya_love-story-breakup-story-in-marathi-marathi-trends

अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत ‘सो कॉल्ड लव अफेअर’ बद्दल कायमच बॉलिवूडमध्ये चर्चा रंगत असते.जेव्हा जेव्हा बिग-बी आणि रेखा यांचा आमना-सामना होतो तेव्हा त्यांच्या त्या प्रेमप्रकरणाबद्दल किस्से रंगतात.

ऐंशीच्या दशकातील  तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले ‘लव्ह बर्ड्स’ अमिताभ आणि रेखा त्याकाळातील युवकांचे प्रेमाचे आदर्श कपल मानले जायचे. सोशल इव्हेंट आणि पार्टीमध्ये अमिताभ आणि रेखा सर्रास एकत्र पाहायला मिळायचे. रेखा व अमिताभ हे एकमेकांशी लग्न करतील की काय असे त्यावेळी वाटत होते.

या जोडीचा ऑफ स्क्रिन आणि ऑन स्क्रिन रोमान्स खूप प्रसिद्ध झाला होता. जया बच्चन यांच्या सोबत लग्न केल्यानंतरही अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेम संबंध संपलेले नव्हते. या दोघांबाबत कायमचा वृत्तपत्रे आणि टीव्हीवर बातम्या येत असत. मात्र एक अशी घटना घडली की या दोघांना कायमचे एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले. अमिताभ यांच्या पत्नी जया यांनी अशी काही करामत केली की या दोघांचा ब्रेक-अप झाला.

मात्र 1976 मध्ये जया बच्चन यांनी एक दिवस अमिताभ बच्चन आउटडोर शूटिंग करता बाहेरगावी गेलेले असताना रेखा यांना डिनरचे आमंत्रण दिले. रेखा देखील डिनरच्या या आमंत्रण करता आवर्जून उपस्थित राहिल्या. असे म्हटले जाते की या डिनर पार्टीच्या वेळेस रेखा आणि जया बच्चन या अगदी मैत्रिणी सारख्या एकमेकांशी गप्पा मारत बसल्या होत्या.

त्यांच्या गप्पांमध्ये एकदाही अमिताभ यांचा विषय देखील आला नव्हता. जया व रेखा यांनी अगदी खेळीमेळीने, हसत-खेळत गप्पा मारत डिनर पार्टी केली. जेवण झाल्यावर जेव्हा रेखा आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा जया बच्चन रेखा यांच्यासोबत यांना गाडीपर्यंत सोडण्याकरता गेल्या.

गेटवर पोहोचल्यावर जया बच्चन यांनी रेखा यांना,
“चाहे कुछ भी हो जाये, मैं अमिताभ को नही छोडूंगी!” असे बोलल्या. तेव्हा रेखा  बघतच राहिल्या व त्यांना समजून गेले की अमिताभची पत्नी जया बच्चन यांनी आपल्याला एक प्रकारे निर्वाणीचा इशाराचं केला आहे की, आमच्या संसारांमध्ये तू पडू नकोस!

आउटडोर शूटिंग पूर्ण केल्यावर जेव्हा अमिताभ बच्चन आपल्या घरी परत आले तेव्हा त्यांना या डिनर पार्टी बद्दल माहिती समजली आणि त्यांना हे ही समजले की आता जया आपल्याबद्दल खूप अलर्ट आहे व त्यांनी रेखापासून आपले संबंध संपवून टाकले.

अशाप्रकारे अमिताभ आणि रेखा यांचा ब्रेक-अप झाला. रेखा व जया बच्चन यांच्या डिनर पार्टीमध्ये घडलेल्या घटनेमुळे अमिताभ व रेखा यांची अॉन स्क्रीन व ऑफ स्क्रीन केमिस्ट्री पूर्णपणे संपुष्टात आली. त्यानंतर या दोघांनी कधीही एकत्र कोणत्याही चित्रपटात काम केले नाही!

 

Leave a Reply