फ्रेंडशिप डे निम्मित झी टॉकीज घेऊन येत आहे ‘यारी दोस्ती स्पेशल संडे’

0
609
Ashi Banwa banwi - Spend Yari Dosticha Special Sunday with Zee Talkies

खरी मैत्री जर असेल तर ती आयुष्यभर टिकते अस मानलं जातं. हि गोष्ट बऱ्याच चित्रपटांद्वारे अधोरेखित करण्यात येते. म्हणूनच झी टॉकीज फ्रेंडशिप डे निम्मित घेऊन येत आहे चार सुपरहिट चित्रपटांचा नजराणा.

नागराज मंजुळे दिग्दर्शित, बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जाणारा सुपरहिट चित्रपट ‘सैराट’ रविवार २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रसारित होणार आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या त्रिकुटाच्या अभिनयाने नटलेला 1985 सालचा सुपरहिट विनोदी चित्रपट ‘धूम धडाका’ दुपारी 3 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि बनवा बनवी’ संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आह. रितेश देशमुखने ज्या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असा आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट ‘लय भारी’ रात्री ९ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे या मोहोत्सवाचा समारोप होणार आहे.

Leave a Reply