जर तुम्हालाही रात्री अचानक जाग येते? तर हे आहेत त्यामागचे कारण! जाणून थक्क व्हाल!??

0
841
रात्री-अचानक-जाग-येते-marathitrends-ghost-story-bramha-muhurt-benifit-spiritual-life

आपल्याला अनेकदा रात्री अचानकच झोप मोडलेली जाणवले असेल! कधीकधी आपल्याला असे अचानक वाटते की कोणीतरी आपल्याला गदगदून हलवले आहे आणि झोपेतून उठवले आहे की काय? तुम्ही तेव्हाची वेळ घड्याळात बघितली होती काय? तेव्हा घड्याळात तीन वाजले होते का?

कधी आपल्याला अचानक झोपेतून जाग आल्यावर असे वाटले होते की आपल्याला जवळपास कोणीतरी उभे आहे असे वाटले होते काय? जर तुमच्या बाबतीतही असे काही घडले असेल, तर आजच्या या लेखातून आपल्याला त्या घटनेने मागच्या कारणांची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत!

असे म्हटले जाते की सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त असतो. हा काळ देवपूजा व चिंतन करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. मात्र जगभरात यावेळेला सैतानी शक्तींची वेळ असे म्हटले जाते. चला तर आज या लेखाद्वारे जाणून घेऊया नक्की काय तथ्य जगभरात या वेळेबद्दल सांगितले जातात.

ख्रिश्चन संप्रदायातील कॅथलिक संप्रदायांच्या मान्यतांनुसार असे म्हटले जाते कि, भगवान येशू मसीहाला जेव्हा क्रूसावर चढविण्यात आले होते, तेव्हा सर्व शैतानी शक्ती देवाच्या शक्तीपुढे खूप कमजोर पडल्या होत्या. मात्र यानंतर अगदी दोन तासांमध्ये म्हणजेच पहाटेच्या तीन वाजता सैतानी शक्ती अचानक शक्तिशाली झाल्या होत्या.

याशिवाय ख्रिश्चन धर्मामध्ये अशी देखील मान्यता मानली जाते की क्रॉसचे सुलटे चिन्ह अगदी पवित्र मानले जाते. तसेच तोच क्रॉस उलटा केल्यावर सैतानाचे चिन्ह बनते. त्याचप्रमाणे सकाळची तीन वाजेची वेळ देवाचा पवित्र वेळ सुरू होते तर पहाटेच्या तीन वाजता सैतानाचा काळ सुरू होतो अशी मान्यता ख्रिश्चन धर्मामध्ये पाहायला मिळते. असे म्हटले जाते की, तांत्रिक लोक सिद्धी प्राप्त करण्याकरता भल्या पहाटे तीन वाजता उठुन तंत्रसाधना करत असतात.

पहाटे तीन वाजता केलेली तंत्रविद्येची साधना सफल होते. तसेच यावेळी दिलेला बळी देखील फलदायी असतो. यामुळेच पहाटे तीन वाजेची वेळ तंत्र विधीसाठी चांगली मानली जाते. शास्त्रज्ञांच्यामते या वेळेस आपले मस्तिष्क जागे होते अमूमन हा असा वेळ असतो ज्यामध्ये मस्तिष्क आणि शरीर पूर्णपणे शिथिल झालेले असतात.

शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळे आपले शरीर आणि मस्तिष्क पूर्णपणे शांत झालेले असते. थकवा पूर्णत: गेल्यामुळे मेंदू या काळामध्ये ऍक्टिव्ह होत असतो. यामुळेच शास्त्रज्ञांच्या मते अचानक झोप उडणे व अंगाला घाम येणे, हृदयाच्या स्पंदनांमध्ये अचानक वाढ होणे, तसेच हात आणि पाय थंड पडणे, डोळे उघडणे आपल्या आसपास कोणीतरी आहे असा भास होणे, हे सगळे अमूमनमुळे होत असते. ज्यामध्ये मेंदू जागृत अवस्थेत असतो. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट द्वारे नक्की  कळवा.

Leave a Reply