लग्नानंतर मानसीने करते शेतावर काम, पतीबरोबर शेतावर केला रोमँटिक फोटोशूट…!

0
814
manasi-naik-weeding-shoot-photos-marathitrends-husband-name-age-work
manasi-naik-weeding-shoot-photos-marathitrends-husband-name-age-work

पुण्यामध्ये थाटामाटात शाही पद्धतीने विवाहबद्ध झालेले महाराष्ट्राची सुपर डांसर मानसी नाईक आणि हरियानाचा इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरा यांनी अगदी शाही विवाह सोहळ्यामध्ये काही दोवसांपूर्वी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे!

मानसीच्या लग्नातील लूक वर सर्वच प्रेक्षक वर्ग व सेलेब्रिटीज लोकांनी तिची खूप प्रशंसा केली होती.

लग्नामध्ये मानसीने अगदी ‘महाराणी जोधाबाई’ चा लुक धारण केला होता. तसेच प्रदीप खरेरा यांनी देखील अगदी राजा-महाराजा सारखा शेरवानी आणि मुकुट परिधान केला होता. विवाहनंतर ‘मिस्टर अँड मिसेस खरेरा’ आता त्यांच्या हरियाणातील मूळ गावी ‘फरिदाबाद’ येथे परतले आहेत. लग्नानंतरच्या राहिलेल्या सर्व परंपरा हरियाणवी पद्धतीने पार पाडण्यात आल्या आहेत. या रीतिंनुसार मानसीने तिथल्या पारंपरिक पद्धतीमध्ये तिच्या देवर आणि नणंदेसोबत पारंपारिक नौंकझौंक देखील केली आहे.

एकंदरीतच प्रदीप खरेरा यांच्या कुटुंबामध्ये मानसी अगदी सहज मिक्स-अप झाली आहे. नुकताच मानसीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नानंतरच्या व्हिडिओ मध्ये मानसी व तिचा पती प्रदीप या दोघांनी त्यांच्या शेतामध्ये रोमँटिक व्हिडिओ  शूट करत प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. ज्यात नवे नवरदेव व नवरी असलेले मानसी आणि प्रदीप सरसोच्या शेतात रोमँटिक होताना दिसत आहेत.

तसेच त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अनेक फोटो देखील काढले आहेत. मानसीने यासोबतच तिच्या सासरकडच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत शेतात एक फोटो काढला आहे व शेअर केला आहे. या फोटोमध्ये मानसीने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घातलेला आहे व नव्या नवरीच्या या पंजाबी लुक मुळे ती अतिशय गोड दिसत आहे.

लग्न झाल्यापासून मानसी नाईकने तिचे व तिच्या पतीच्या शोबतच्या अनेक गोड क्षणांचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. रोमँटिक व्हिडिओ सोबतच तिने आपल्या लग्नातील इमोशनल सिन असलेले व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.

ज्यामध्ये मानसीच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले दिसत आहेत, तर तिची आईदेखील मानसीच्या मेहंदी डान्स मध्ये रडताना दिसत आहे. मानसीच्या पाठवणीच्या वेळेचा आई व मुलीचा गळाभेटीचा इमोशनल फोटो देखील मानसीने शेअर केला आहे.

सोबतव मानसीने तिच्या सासरच्या मंडळीसोबत शेतात गेली तेव्हा गुलाबी पंजाबी सूटवर एका हातात विळा व एका हातात सरसोच्या झाडांची जुडी असा एक फोटो गोड स्माईलवाला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मानसी एकदमच खमकी ‘हरियाणवी छोकरी’ वाटत आहे.

एकूणच आपली महाराष्ट्राची खमकी मुलगी मानसी हरियाणामध्ये देखील आपला दबदबा कायम करणार हे मात्र निश्चित दिसत आहे! मानसी तिच्या करीअरचे काय करणार याची काळजी तिच्या लाखो फॅन्सला आहे. सोबतच मानसी आणि प्रदीप आता मुंबईला शिफ्ट होणार की कायमचे हरियाणालाच सेटल्ड होणार याबाबत मानसीच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

Leave a Reply