नीता अंबानी ने आपले वजन कमी करण्यासाठी वापरल्या होत्या ह्या टिप्स…! वजन कमी करणे आहे खूपच सोपे तसेच स्वस्तही…!

0
773

लॉस आणि तो ही फायदेशीर, खरं वाटत नाही ना?
हो ! आज आम्ही अश्या लॉस विषयी सांगणार आहोत जो चक्क फायदेशीर आहे.
अहो, फायदेशीर लॉस म्हणजे वेट लॉस !

 

आज हेल्थ इंडस्ट्री ही जगात आणि आपल्या देशात वेगाने वाढत असलेली एक इंडस्ट्री आहे. आज लठ्ठपणा एक कॉमन आणि गम्भीर स्वरूपाचा आजार व डोकेदुखी होऊन बसली आहे, कारण त्याचे काही गम्भीर परिणाम ही आपल्याला दिसायला आणि समजायला लागले आहेत. आणि म्हणूनच कदाचित ‘खाया पिया अंग लगेगा’ अशी परंपरा असलेल्या आपल्या देशात आज गल्ली बोळात जिमचे फ्याड सुरु झाले आहेत व कधी नव्हे तेव्हढे लोकं हेल्थ कॉन्शस होताना आपल्याला दिसत आहे.

 

बदलती लाईफ स्टाईल, आहार पद्धती व सतत आठ ते दहा तास बसून काम करणे ह्या मुळे लठ्ठपणा लवकर बळावतो आहे. मग ह्या वर विविध उपचार सुरु होतात, पण वजन काही कमी होण्याचे नाव घेत नाही व आपण खचून जातो.

मग अश्यावेळेस आपल्याला प्रेरणा देण्यासाठी समोर एखादे उदाहरण लागते, एखादा रोल मॉडेल लागतो. त्यात ही तो सेलिब्रेटी असेल तर तो आपल्याला लवकर भावतो. अमीर खान ने दंगल चित्रपटासाठी केलेले बॉडी ट्रान्सफॉर्मशन असो नाहीतर चक्क ९४ किलो वजन कमी करणारा गणेश आचार्य. ह्याच यादीत अजून एक प्रेरणादायक नाव आहे ते म्हणजे देशातील सर्वात मोठ्या उद्द्योग समूहाच्या मालकीण बाई, नीता अंबानी ह्यांचे. वयाच्या ५७ व्या वर्षी नीता अंबानी ह्यांनी स्वतः ला ज्या पध्द्तीने फिट बनवले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.

 

एक काळ असा होता जेव्हा नीता अंबानीही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त होत्या. पण आज त्याच स्वत:च्या फिटनेस व स्लिम बॉडीने सर्वांना प्रेरणा देत आहेत. जिथे ५७ व्या वर्षी अनेकजण असंख्य आजारांनी व लठ्ठपणाने ग्रासलेले असतात तिथे नीता अंबानी आजही एकदम फिट व मनमोहक दिसत आहेत. जर तुम्हालाही नीता अंबानीच्या फिनटेसचे सिक्रेट जाणून घ्यायचे असेल व त्यांच्यासारखे दिसायचे असेल तर आम्ही सांगतो त्यांच्या फिटनेस जोडलेल्या काही खास गोष्टी, ज्या फॉलो करून तुम्हीही दिसू शकता सडपातळ.

 

चला तर मग, जाणून घेऊया त्यांचे काही सिक्रेट:
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या आहारात व जीवनशैलीत अमुलाग्र असा बदल केला आहे. वजन कमी करण्यासाठी नीता अंबानी यांनी खूप सारी फळे, भाज्या व नट्स खाण्यास सुरूवात केली. यासोबतच त्या नियमित न चुकता योग व एक्सरसाइज करतात. ज्यात योग, स्विमींग व जीम मधील वर्कआउट याचा समावेश आहे.

 

बीटाचा रस आणि त्याचे फायदे :
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपण ज्या बीटाकडे बघून नाक मुरडतो त्या एका बीटानेच नीता अंबानीला वजन कमी करण्यासाठी मोलाची मदत केली आहे. नीता अंबानी लठ्ठपणा कमी करण्यासाठी न चुकता रोज एक ते दोन ग्लास बीटचा ज्यूस पितात. बीट न्युट्रिएंट्स गुणांनी भरलेलं असतं. आपल्या देशात बीट अगदी सहजपणे कोणत्याही मार्केटमध्ये मिळते.

 

बीटाचा रस फक्त बॉडी डिटॉक्स करण्यासच मदत करत नाही तर पोट साफ ठेवण्याचं देखील काम अगदी चोख निभावतो. बीट मध्ये फॅट नसल्यातच जमा असतात आणि कॅलरीजचे प्रमाण देखील खूप कमी असते. ज्यामुळे बीट किंवा बीटचा ज्यूस वजन कमी करण्यास खूप लाभदायक सिद्ध होतो.

 

डान्स प्रॅक्टिस :
नीता अंबानी ह्यांनी भरतनाट्यम सारख्या क्लासिकल डान्सची ट्रेनिंग घेतली आहे. नियमित डान्सचा अभ्यास किंवा सराव केल्याने संयम, सहनशीलता व संतुलनच वाढत नाही तर तणावमुक्त होण्यासही मदत मिळते. याव्यतिरिक्त बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा डान्सचा खूप उपयोग होतो. त्यामुळे जर तुम्हाला सडपातळ बांधा, स्लिम-ट्रिम बॉडी हवी असेल व फिट राहायचं असेल आणि डान्सची आवड असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

 

बोले तैसा चाले …!
आपल्याला माहितीच आहे कि नीता अंबानी ह्यांचा मुलगा हा सुद्धा खूप लठ्ठ होता. त्याला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी स्वतःला रोल मॉडेल बनवले. जेणे करून मुलाला त्याच्या या अवघड प्रवासात एकटेपणा वाटू नये. त्यामुळे अनंत अंबानीलाही नीता अंबानीकडून वजन कमी करण्यासाठी सकारात्मक मानसिक सपोर्ट मिळाला.

जेव्हा त्या आपल्या मुलाला वजन कमी करण्यासाठी मोटिवेट करत होत्या तेव्हाच त्यांनी आपलं ही वजन कमी करण्याच्या दिशेनेही पावलं उचलली. शेवटी आई-वडिलच असतात जे आपल्या मुलांना ध्येयप्राप्तीसाठी आत्मविश्वास देण्यासोबतच तिथवर पोहचण्याच्या प्रवासात हवी ती मदत करण्यासाठी तयार असतात. एकमेका साहाय्य करू …

आज कित्येक मुलं ही लठ्ठपणाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना मेंटल सपोर्ट देण्याऐवजी त्यांचे पालक त्यांच्या लठ्ठपणाची लाज वाटून घेताना दिसतात , पण नीता अंबानींच्या मते असं करणं साफ चुकीचं आहे. कारण लठ्ठपणा कमी करण्याची सर्वात पहिली पायरी आयुष्याप्रती सकारात्मकता, तणावमुक्त जीवनशैली, रिफ्रेश व आनंदी मुड, स्वत:चा स्विकार करून त्यात बदल करण्याचे प्रयत्न या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या मुलांना झिडकारण्यापेक्षा त्यांना स्विकारून या प्रवासात त्यांचा सोबती झालं पाहिजे. वेट लॉस जर्नीमध्ये आई व मुलाने एकमेकांना खूप प्रोत्साहित केलं. अनंतची आई शोभावी म्हणून त्याच्यासोबत मी देखील वजन कमी केलं असं नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले. वजन कमी करण्याच्या प्रवासात तो माझा सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत होता. कारण आम्ही दोघं एकाच समस्येला हरवण्यासाठी प्रयत्न करत होतो.

विशेष सूचना :- या लेखात आम्ही फक्त स्वत:ला सकारात्मकरित्या कसं स्विकारावं व स्वत:वर प्रेम करता करता हवं त्या ध्येयापर्यंत कसं पोहचावं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा अट्टहास आहे. आम्ही नीता अंबानींच्या वेट लॉसविषयी कोणताही दावा करत नाही आहोत.
यातून पॉझिटिव्ह एनर्जी घ्या व आजच सुरू करा तुमची एक खास वेटलॉस जर्नी !

Leave a Reply