‘वरून धवन’ आणि ‘नताशा दलाल’ यांच्या लग्नाला ‘बॉलीवूड’ च्या या कलाकारांना मिळाले होते आमंत्रण…!

0
196
varun-dhavan-marriage-wedding-wife-photos-natasha-dhavan-love-story
varun-dhavan-marriage-wedding-wife-photos-natasha-dhavan-love-story

कोरोना काळानंतर मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेते व अभिनेत्री लगिनघाई करताना पाहायला मिळत आहेत! यावर्षी अनेक अभिनेते व अभिनेत्रींनी स्वत:ला विवाहबंधनात बांधून घेतले आहे!
बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे बहुचर्चित विवाह कायमच मीडियात चर्चेचा विषय बनलेले असतात.

यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीजच्या लग्नांमध्ये केलेले डेकोरेशन, त्यांचे फॅशनेबल डिझायनर कपडे आणि एकूणच सगळा माहोल सामान्य लोकांकरता केवळ एक स्वप्नवत दिखावा वाटत असतो. बॉलीवूड सुपरस्टार वरुण धवन व त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचे अनेक वर्ष चाललेल्या अफेअरची चर्चा मीडियामध्ये कायमच बातम्यांमध्ये टॉप लिस्ट असायची.

वरुण धवन व नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. मात्र दोघांनी आता आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे व आपल्या आयुष्यामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्यापलीकडे जाऊन दोघांनी एकमताने आता एकमेकांसोबत पती-पत्नीच्या नात्यात येण्याचा व साता जन्माच्या  बंधनात अडकुन संसार करण्याचा निर्णय घेतला आहे.

डेविड धवन यांचे धाकटे पुत्र असलेले वरुन धवन आपल्या नटखट अंदाज आणि अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांचे आवडता अभिनेता बनला आहे. वरुन धवनचे लाखो करोडो फॅन्स भारतासोबत जगभरात देखील आहेत. वरुन धवन आणि नताशा दलाल यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या लग्नाचे नियोजन मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे.

24 तारखेला होणाऱ्या त्यांच्या विवाह सोहळ्याकरता वरुण आणि नकाशा यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार अलिबागला रवाना झाले आहेत. वरुण व नताशाच्या लग्नाचे रीतीरिवाज देखील अलिबागच्या रिसोर्टवर पार पाडण्यात येत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यांनी स्वतः आपला अलिबागचा आलिशान बंगला वरुण धवनच्या लग्नासाठी उपलब्ध करून दिला आहे. वरून धवन चे नातलग व कुटुंबीय या बंगल्यामध्ये वास्तव्य करत आहेत.

लग्न अलिबाग येथे थाटामाटात व धूमधडाक्यामध्ये पार पाडल्यानंतर वरुण धवन व त्याची होणारी बायको नताशा दोघेही येथूनच ‘तुर्की’ साठी हनीमून करता रवाना होणार आहेत. दरम्यान वरून धवन च्या विवाह सोहळयाकरता खूप मोजके बॉलिवूड सेलिब्रिटीज आपली हजेरी लावणार आहेत. कोरोनाच्या परिणामामुळे बरेच बॉलिवुड सेलेब्रिटीज या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

मात्र सर्वांनी वरून व नताशा यांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नसोहळ्याकरता शुभेच्छा दिल्या आहेत . सुत्रांच्या माहितीनुसार बॉलिवुड चा बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खान व दबंग खान सलमान खान या लग्नाला हजेरी लावणार आहेत. अलिबाग मधून लग्नसोहळा पार पाडल्यानंतर पुढच्या आठवड्यात वरुण व नताशा यांच्या लग्नाची ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे!

वरुण धवन आणि नताशा दलाल यांना लग्नाकरता खूप खूप शुभेच्छा!!
नांदा सौख्य भरे!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here