सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी बांधली लग्नगाठ!! पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाह सोहळा…

0
717
sid mitali wedding photos pic image date age mayekar siddhart zee yua
sid mitali wedding photos pic image date age mayekar siddhart zee yua

२०१७ पासून रिलेशनशिपमध्ये असलेले मराठी फिल्म इंडस्ट्रीतील क्युट कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर!! अखेरीस आज या कपल ने पुण्यामध्ये  विवाह बंधनात एकमेकांना बांधुन घेतले आहे.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी जानेवारी 2019 मध्ये ऑफिशिअली आपण लग्न करणार आहोत असे अनाउन्स केले होते, यानंतर दोघांचा साखरपुडाही विधिवत पार पडला होता. जून 2020 मध्ये सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाची तारीख ही पकडण्यात आली होती. दोघांनीही आपल्या लग्नाची खूप सारी स्वप्ने रंगवली होती, ग्रँड वेडिंग करण्याचा ठरलेल्या आपल्या लग्नाचा प्लॅन अचानक कोरोना महामारीमुळे पूर्णत: कोलमडून पडला.

कोरोनाकाळामुळे मिताली आणि सिद्धार्थ यांचे नियोजित द जून 2020 मध्ये होणारे लग्न पोस्टपॉन करण्यात आले होते.  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 2020 च्या दिवाळीमध्ये एकत्र एक रोमँटिक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये मितालीने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत फोटोखाली कॅप्शनमध्ये “मिस्टर अँड मिसेस चांदेकर नेक्स्ट इयर”असे लिहुन आपण 2021 मध्ये लग्न करणार याबद्दल संकेत दिले होते.

मात्र त्यांच्या लग्नाची तारीख काही केल्या फिक्स होत नव्हती. ज्याला आज मुहूर्त लाभला व दोघे लग्नबंधनात अडकले. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपट केले असून त्याचा खूप मोठा फॅन फॉलॉवर वर्ग आहे. मिताली मयेकर सध्या ‘झी’ मराठीच्या ‘लाडाची मी लेक ग’ या प्राईम टाईम मालिकेमध्ये लीड रोलमध्ये  कस्तुरी नावाच्या नर्सची भूमिका साकारत आहे.

मितालीच्या कस्तुरी या व्यक्तिरेखेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे. सिद्धार्थ चांदेकर देखील टी.व्ही शो मध्ये एका हॉरर सिरीज मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ” तू आहेस का?” असे त्या वेब सिरीजचे टायटल आहे.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनीही आपला विवाह अगदी जुन्या काळातील पद्धतीने करण्याचे योजले होते. त्याकरता त्यांनी पुण्याबाहेरचा एक जुना वाडा निवडला होता. त्यांच्या मनाप्रमाणेच अगदी स्वप्नवत “ब्लॅक अॅण्ड व्हाईट जमान्यातील थीम” नुसार हा विवाह पार पडला आहे.

या विवाहामध्ये मितालीने हिरव्या रंगाची पेशवाई पैठणी नेसली होती तर त्यासोबत जांभळ्या रंगाचा शेला देखील पांघरलेला होता. तर सिद्धार्थ चांदेकर जांभळ्या रंगाच्या शेरवानी मध्ये विवाह सोहळ्यामध्ये खूपच राजबिंडा दिसत होता!  खूपच पारंपारिक आणि जुन्या काळच्या स्टाईलने केलेल्या या लग्नाची चर्चा संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होताना दिसत आहे!

सिद्धार्थ व मितालीच्या लाखो फॅन्सने  या लग्नाच्या थीम चे आणि साध्या सोज्वळ लुकमधील या जोडीचे खूपच कौतुक केले आहे. अगदी मोजक्या व जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पुण्याबाहेर एका वाड्यात पार पाडण्यात आला आहे. सिद्धार्थ आणि मितालीला लग्नासाठी व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply