मराठी सिनेसृष्टीत झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट; जाणून घ्या त्याबद्दलची माहिती

0
355
23 historical films to be screened in Marathi cinema Learn about it

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या पडद्यावर हिट होताना पाहायला मिळाले आहेत. त्यातील बहुचर्चित हे चित्रपट म्हणजे शिवराज अष्टकमधील ‘फर्जंद’,’फतेशीकस्त’,’पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.असेच अजून काही शिवकालीन चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. यापुढे मराठी सिनेसृष्टीत जवळजवळ २३ शिवकालीन चित्रपट प्रेक्षकांच्या नजरेत येणार आहेत.यातील बहुतेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत,तर काही निर्मितीप्रकियेत आहेत तर काही चित्रपट घोषणेपलिकडे जाऊ शकलेले नाहीत.

SherShivrajMarathiMovie

शिवराज अष्टकमधील सुप्रसिद्ध लेखक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद’,’फतेशीकस्त’,’पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे चार चित्रपट तर प्रदर्शित केलेच आहेत पण,शिवराज अष्टकमधील पाचव्या चित्रपटाची जोरदार तयारी चालू असून या चित्रपटाच्या शीर्षकाचीही घोषणा लवकरच करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.खासदार,डॉ.अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसोबत शंभूराजांच्या वगक्तिरेखेतही आपला उत्तम ठसा उमटवलेला पाहायला मिळाला. तसेच ‘शिवप्रताप’ च्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाचा यशस्वी जागर करण्याचा निश्चय केला आहे.

pravin-tarde-in-as-sarsenapati-hambirrao-movie-poster

मराठी रंगभूमीचा पाया असलेले नाटक,मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमातून पुढे झालेल्या अमोल कोल्हेंनी ‘शिवप्रताप-वाघनख’,’शिवप्रताप-वचपा’ आणि ‘शिवप्रताप-गरुडझेप’ या तीन चित्रपटाची घोषणा फार आधीच केली आहे. या दोन आघाडी सिनेमा पैकी ‘शिवप्रताप-वाघनखं’ला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर ‘बाल शिवाजी’ या शीर्षकाने दोन चित्रपट बनविण्यात येणार आहेत.

Pavankhind movie

 

रवी जाधव यांपैकी एकाचे दिग्दर्शन करणार आहे,तर रितेश देशमुखनेही दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या साथीने ‘बाल शिवाजी’ची घोषणा केली आहे.महत्त्वाचे म्हणजे नागराज आणि रितेश यांनी ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटांचीही योजना आखली आहे. या आगामी चितापटला अजय-अतुल संगीत देणार आहे.

Leave a Reply