बजरंग दल कार्यकर्ता हत्या प्रकरणी 8 आरोपींना अटक, शाळा-कॉलेजांना सुट्टी ..

0
391

कर्नाटक येथील (Karnataka) शिमोग्गा जिल्ह्यातील (Shivamogga District) बजरंग दलाचा कार्यकर्ता (Bajrang Dal Worker) हर्षाच्या हत्येप्रकरणी पुन्हा एक बातमी समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी आणखी काही आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.

Bajrang Dal harsha marder case

शिमोग्गा येथील एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले , बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ ही या आरोपींची नावे आहेत. आणि याप्रकरणी एकूण 12 जणांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 8 आरोपींचे वय 20 ते 22 पर्यंतचे आहे.

Bajrang Dal harsha

कर्नाटकात 20 फेब्रुवारीला हर्षाची हत्या करण्यात आली होती. हर्षाच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी आरोप केला होता की, तो बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे म्हणून काही बदमाशांनी त्याची हत्या केली आहे. हर्षाच्या मृत्यूनंतर शिमोग्गासह संपूर्ण कर्नाटकात निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, शस्त्रांचा वापर केला आणि वाहनांची जाळपोळही केली. त्यामुळे पुन्हा एकदा वादाची आग पेटली आहे.

त्यामुळे आरोपींच्या अटकेनंतरही शिमोग्गामध्ये संचारबंदी वाढवण्यात आली आहे. व शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येथे फक्त सकाळी 6 ते 9 या वेळेतच हालचाली होतील. त्याचबरोबर कलम 144 देखील दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. शिमोग्गा उपायुक्त डॉ. सेल्वामणी आर म्हणाले.

Leave a Reply