अभिषेक आणि केआरकेमध्ये रंगले ट्विटरवॉर; तर अभिषेक बच्चनने दिले सडेतोड उत्तर

0
335
Abhishek and KRK painted Rangwar Twitterwar; Abhishek Bachchan gave a blunt answer

अभिषेक बच्चनने ‘वाशी’ चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आणि ट्विट केले. त्यावरून आता अभिषेक बच्चन आणि कमाल आर खान यांच्यात ट्विटरवॉर रंगले आहे. आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेल्या अभिनेता कमाल आर खान यांनी थेट अभिषेक बच्चनवर निशाणा साधला आहे. केआरकेच्या टीकांवर अभिषेकही गप्प बसला नाही. अभिषेकने त्याला कमाल आर खानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Abhishek Bachchan

अभिषेक बच्चनने आपल्या ट्विटमध्ये साऊथ चित्रपट ‘वाशी’चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, ‘मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधून वाशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गुडलक टोविनो थॉमस, कीर्ती सुरेश आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा. असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केली. यावर कमाल आर खानने हे नजरेस पडले तेव्हा कमाल आर खानने अभिषेकचे ट्विट रिट्विट केले आणि ‘ कधी कधी तुम्ही बॉलीवूडचे लोकही अविश्वसनीय चित्रपट बनवतात.’ असे लिहीले .केआरकेने अभिनेता अभिषेक बच्चनशी पंगा घेतला आहे. आता हा वाद आणखी वाढत असल्याचे दिह्सत आहे.

Kamaal R. Khan

हे पाहता अभिषेकने लगेचच अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर दिले. ‘मी प्रयत्न करेन, तुम्ही देशद्रोही नाही केले होते.
यावर पुन्हा एकदा अभिषेकचे उत्तर वाचून केआरकेने लिहिले, ‘हाहाहा, तुझ्या मेकअपमनचे बजेट माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. दुसरे म्हणजे, तुम्ही बॉलीवूडवाल्यांनी ते होऊ दिले नाही. अन्यथा, ब्लॉकबस्टर बनवून दाखवले असते. यावर पुन्हा एकदा अभिषेक केआरकेला म्हणाला, “चला, तुम्ही पण प्रयत्न करा. आशा आहे की या संघर्षात तुम्ही यशस्वी व्हाल.” यावर केआरके उत्तर देत म्हणाला, “मी शांत बसलो आहे कारण मला माहित आहे बॉलिवूड माफीया मला काही करू देणार नाही.” त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Leave a Reply