सिंघम मधील ‘या’ अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्त

0
371
actress Kajal Aggarwal from Singham received Putra Ratna

मुंबई – अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू यांना मंगळवारी सकाळी एक गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी सकाळी बाळाचा जन्म झाला. आई आणि मूल दोघेही ठीक आहेत. काजलचे चाहते नवजात मुलाची पहिली झलक शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत काजल अग्रवालने सांगितलं की,

तिच्या मुलाचं नाव नील किचलू आहे. ज्याचा जन्म १९ एप्रिल २०२२ रोजी झाला. एवढंच नाही तर या पोस्टमध्ये त्यांनी आजी-आजोबांसह संपूर्ण कुटुंबाची नावं असलेलं एक सुंदर कार्डही पोस्ट केलं आहे. काजलने पोस्टमध्ये लिहिलं, ‘मी खूप आनंदी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद.’

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी एका छोट्याशा खासगी समारंभात विवाहबद्ध झाले होते. या विवाहास फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांनीच हजेरी लावली होती. एकमेकांसाठी बनलेल्या या जोडप्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच, काजलने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून तिने पतीला अद्भूत व्यक्ती म्हणत त्याचे आभार मानले होते.

Leave a Reply