अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल 12 वर्षानंतर छोट्या पडद्यावर या मालिकेमधून करतेय कमबॅक

0
370
Actress Urmila Kothare is making a comeback from this series on the small screen after 12 years

महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनलं आहे. स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

Urmila Pic

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, ‘खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पहाते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका तुझेच मी गीत गात आहे २ मे पासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

Leave a Reply