बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार नुकताच अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यासोबत एका तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीत दिसला होता. यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. ट्रोलिंगनंतर, अभिनेत्याने याबद्दल त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आणि भविष्यात अशी कोणतीही जाहिरात करणार नाही असे वचनही दिले. अक्षय कुमारचा त्रास अद्याप कमी झाला नसला तरी तो सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सिगारेटची जाहिरात करताना दिसत आहे. अक्षय कुमारच्या या फोटोबाबत एका ट्विटर युजरने लिहिले, “कृपया असे म्हणू नका की तुम्ही तंबाखूचे समर्थन केले नाही. तुम्ही लाल आणि पांढऱ्या सिगारेटचे पोस्टर बॉय होता. बरोबर का?”
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
‘या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन परत करणार का?’ अशा आशयाचे प्रश्न करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘तुमच्या माफीचा फायदा काय आहे सर, जाहिरात तर चालूच राहणार आहे. हिंमत असेल तर ही जाहिरात बंद करून त्यांचे पैसे त्यांना परत करा.’
विमल पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट लिहून माफी मागितली. या पोस्टमध्ये अक्षय कुमारने लिहिले की, “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.”
त्यांनी पुढे लिहिले की, “मी ठरवले आहे की या जाहिरातीतून कमावलेले सर्व पैसे मी कोणत्या तरी चांगल्या कामासाठी लावेन. कायदेशीर प्रक्रियेमुळे, हि जाहिरात काही काळासाठी ऑन एअर राहील पण मी वचन देतो की भविष्यात मी याबद्दल खूप काळजी घेईन. भविष्यातही तुम्ही तुमचे प्रेम आणि प्रार्थना माझ्यासोबत ठेवावी अशी माझी इच्छा आहे.”