लग्नाच्या वाढदिवसानंतर जेनेलिया – रितेश ने दिली गुड न्यूज. काय आहे स्पेशल गुड न्यूज?

0
425
After the wedding anniversary Genelia- Riteish Deshmukh gave good news what is this special good news

जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख लवकरच एका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक जोडी जेनेलिया आणि रितेश देशमुख लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. नुकतंच दोघांच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर पोस्ट झाले आहे. ज्यामध्ये दोघंही गरोदर दाखवण्यात आले आहेत. ‘मिस्टर ममी’ असे या चित्रपटाचे नाव आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत आहेत. सोबत भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत.genelia deshmukh

पोस्टरनुसार हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचं दिसत आहे. दोघही बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार असल्याचं समोर येत आहे. विशेष असे कि दोघांनी गमतीने कमेंट करत आधीच चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ३ फेब्रुवारीला दोघांनी त्यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान, त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. आणि त्याच दरम्यान, T-Series च्या अधिकृत ट्विटर हँडलवर रितेश आणि जेनेलिया यांना टॅग करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रितेश ने जेनेलिया टॅग करत लिहिले की, ‘आम्हाला कळलंय की तुमच्याकडे एक गोड बातमी आहे?’
यावर अभिनेत्री म्हणते की, ‘मी यांना विचारून सांगते. पण आता सांगू का?’ तेव्हा रितेशही उत्तर देत म्हणतो की, ‘अरे माझ्या मुलांची आई, थांब जरा, आपण उद्या सांगू.’ यानंतर चाहत्यांना काही कळलं नाही पण त्यांनी गोड बातमीसाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.

ritesh deshmukh

त्यावर त्यांच्या चाहत्यांनी एकामागोमाग एक कमेंट केल्या, एका चाहत्याने असे म्हंटले , ‘गोड बातमीबद्दल अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ दुसर्‍याने लिहिले, ‘तुम्ही दोघे म्युझिक व्हिडिओवर येत आहात का?’ अशा बऱ्याच प्रकारच्या उत्सुकता लागल्या असताना आज आज ४ फेब्रुवारी रोजी अखेर या चित्रपटाची घोषणा झाली. या पोस्टर्सवर रितेश आणि जिनिलिया गरोदर असल्याचे दाखवले आहे. या पोस्टरची टॅग लाइन आहे- भरपूर दिल कॉमेडी पेट से.

आता सर्व चाहत्यांची आवडती जोडी असल्याने आता सर्व जणांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply