KGF2 पाहिल्यानंतर कंगना रणौतची यशसाठी केलेली खास पोस्ट होतेय व्हायरल

0
384
After watching KGF2, Kangana Ranaut's special post for success goes viral

नुकताच रिलीज झालेला ‘ KGF2 ‘ या सिनेमाने पडद्यावर नुसता धुमाकूळ घातला आहे. आणि हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. चित्रपटातील कलाकारांची जरा जास्तच स्तुती होतेय. त्यात बऱ्याच बॉलीवूड कलाकारांनी देखील हा चित्रपट पाहून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यात,
कंगना रणौतनं दाक्षिणात्य सुपरस्टार यशसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे आणि ती पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

kangana-insta news

 

कंगना रणौत तिच्या बिझी शेड्युलमध्येही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील आपली मतं मांडताना दिसते. एवढंच नाही तर अनेकदा ती नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दलही लिहिताना दिसते. आताही तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तिनं, इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिनं यशचं कौतुक केलं आहे. आणि त्यातच त्याची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. एक फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये कंगनानं लिहिलं, ‘यश अँग्री यंग मॅन आहे. ज्याची आपला देश मागच्या काही दशकांपासून वाट पाहत होता. जी ७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणीच घेतली नव्हती.’ आणि हीच कंगनाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

Leave a Reply