अजय देवगणने ‘रनवे ३४’ चित्रपटाबाबत केला मोठा खुलासा

0
332
Ajay Devgn made a big revelation about the movie 'Runway 34'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच ‘रनवे ३४’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित असून या चित्रपटाची सर्वाँना उत्सुकता लागली आहे. सोबतच या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अजय देवगणच करत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

runway-34-teaser-release-date

मात्र नुकतचं अजय देवगणनं या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. हल्लीच झालेल्या एका मुलाखतीत चित्रपटाविषयी बोलताना अजय म्हणाला, ‘संदीप केसवानी आणि आमिल कियान खान म्हणजेच या चित्रपटाचे लेखक दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे या चित्रपटाची कथा घेऊन आले होते. मला त्यावेळी चित्रपटाची कथा फार आवडली होती. मी सुरुवातीला या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाशी जोडला गेलो होतो. पण नंतर मी या चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

runway-34-ajey devgn

चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णयही नंतरच घेण्यात आला. पण अमिताभ बच्चन यांना या चित्रपटासाठी कास्ट करण्याचा निर्णय सर्वात आधी झाला होता.’पण ‘अमिताभ बच्चन यांनी जर या चित्रपटासाठी नकार दिला असता तर मी त्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणालाच कास्ट केलं नसतं.’ अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मेजर’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना अजय म्हणाला, ‘मी त्यांना माझ्या बालपणापासून पाहतोय. पण आतापर्यंत मी त्यांच्यासारखा मेहनती आणि प्रोफेशनल अभिनेता पाहिलेला नाही. ते ज्या एनर्जीने काम करतात ते खरंच माझ्यासाठी कौतुकास्पद आहे.

Ajay Devgn

Leave a Reply