अक्षयचा हॉटसीटपर्यंतचा प्रवास….वडाळ्यामधील अक्षय कदमचं स्वप्न पूर्ण होणार का?

0
347
Akshay's journey to the hot seat Will Akshay Kadam's dream in Wadala come true kon honaar crorepati marathi

कोण होणार करोडपती कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणातून अनेक स्पर्धक सहभागी होत असून हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो. कोणी डॉक्टर व कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे कोण होणार करोडपती चा खेळ जास्त रंगतदार होतो. या आठवड्यात कोण होणार करोडपती मध्ये या आठवड्यात सोमवारच्या भागात वडाळ्यमधील एक स्पर्धक सहभागी होणार आहे.

वडाळा येथे राहणारे अक्षय कदम सहभागी होणार आहेत. अक्षय कदम मध्यमवर्गीय घरातले असून घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरू करण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय या खेळात सहभागी झाले आहेत. आई आणि वडीलाच्या कष्टांची जाणीव असणारे सहानुभूती स्पर्धक अक्षय कदम हे सामग्री लेखक म्हणून काम करत आहे. त्यांच्या घरी आई-वडील आणि तो व एक बहीण असा परिवार आहे. अक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते आणि वडील प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते पण करोनामुळे त्यांचं काम बंद झाले. त्यांची बहीण नायर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस तंत्रज्ञ म्हणून काम करते. अक्षय शिक्षण घेत आईस्क्रिम च्या दुकानात काम करतो आणि खूप कष्ट करून पैसे मिळवतो.

अक्षय कदम यांचा प्रेरक प्रवास….

अक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडूण्यास संगितले होते परंतु आईला काम करण्याची सवय आहे म्हणून तिने अजून काम सोडलेले नाही. आईने खूप कष्ट केले असून याची जाणीव असल्याने अक्षता आईला आराम द्यायचा आहे. अक्षयचं स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरू करायची आहे. ज्यात तो लोकांना अतिशय चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचसोबत त्याचं अजून एक स्वप्न आहे त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरू करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे त्याला जास्त अनुभव आहे. अक्षय २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं उत्सुकता आहे.

kon honaar crorepati

Leave a Reply