marathitrends

हिजाब प्रकरणी अखेर अमित शाहांनी दिली प्रतिक्रिया…

Amit Shah finally responds to hijab case ...

धर्म कोणताही असो पण शाळेच्या नियमानुसार शाळेचे नियम पाळले पाहिजे. शाळांच्या ड्रेस कोडचे पालन केले पाहिजे असे माझे म्हणणे आहे, असेही अमित शाह म्हणाले.

सध्या देशात हिजाब प्रकरणी वाद सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपले मत मांडले. आता मात्र या हिजाबच्या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपले मत मांडले आहे. सर्व धर्माच्या लोकांनी शाळांचा ड्रेस कोड पाळला पाहिजे असे अमित शाह म्हणाले. आणि हे माझे वैयक्तिक मत आहे. श्रद्धेची बाब ही शैक्षणिक संस्थांपासून वेगळी ठेवली पाहिजे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

नेटवर्क १८ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह म्हणाले, सर्व धर्माच्या लोकांनी शाळेचा ड्रेस कोड पाळला पाहिजे. हे प्रकरण अद्याप उच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी न्यायालयाचा जो निर्णय असेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे,” असे अमित शाह म्हणाले. हिजाबच्या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे. मात्र अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हिजाब या प्रकरणावर सुनावणी सुरू असून मंगळवारी दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अंतिम आदेश येईपर्यंत हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती.