महिंद्रा ग्रुप चे अध्यक्ष ‘आनंद महिंद्रा’ स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर कोणता व्हिडीओ पाहतात ते बघा..

0
628
Aanand Mahindra

भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओ मुळे त्यांना स्फूर्ति मिळते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर दरवर्षी ते हा व्हिडिओ पाहतात कारण हा व्हिडीओ त्यांचा जोश (मनोबल किंवा उत्कटता) वाढवितो. व्हिडिओबद्दल बोलताना ते म्हणाले की, हे राष्ट्रगीताचे सर्वोत्कृष्ट गायन आहे.

व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “मी हा व्हिडिओ पहिल्यांदा कधी पाहिला आठवत नाही, पण मी मी माझ्याकडे सेव्ह केला आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर माझा उत्साह वाढविण्यासाठी मी दरवर्षी हा व्हिडिओ पाहतो.

आनंद महिंद्राने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा भारताचे राष्ट्रगीत गात आहे.

व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत गाणाऱ्या मुलाबद्दल बोलताना अब्जाधीश व्यावसायिका म्हणतात की, “या मुलाचे पालक हे ट्विट पाहत असल्यास किंवा कुणालाही या कुटूंबाबद्दल माहिती असेल तर मला कळवा, हा मुलगा आता मोठा झाला असेल आणि आपण आता त्याला राष्ट्रगीत गायला लावले तर तो अजून चांगल्या पद्धतीने नक्कीच गायील.

Leave a Reply