“आई कुठे काय करते” मधील अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती अट

0
404
Aai Kuthe Kay Karate In Aniruddha's real life, the condition was set by his father-in-law before marriage

“आई कुठे काय करते” मधील अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती अट

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “आई कुठे काय करते” कथानक आणि त्यातील पात्रांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अनिरूद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळीने साकारली आहे. मिलिंद गवळी आणि त्यांची पत्नी दीपा यांची लवस्टोरा जरा हटकेच आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा जळगाव रेल्वे स्टेशनवर पाहिले. आणि पहिल्या नजरेतच ते त्यांच्या प्रेमात पडले. त्यवेळी आपण पाहिलेली मुलगी कोण आहे हे देखील त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे ही लवस्टोरी इथेच थांबली.त्यानंतर त्या दोघांची भेट एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात झाली. मिलिंदने तिची सर्व माहिती काढली त्यात तिचे नाव दीपा असल्याचे समजले. माहिती मिळाल्यानंतर मिलिंदने आपल्या कुटुंबियांना सांगितले काही दिवसांनी दीपा आपल्या नात्यातलीच आहे हे त्यांना समजले.

मिलिंदच्या घरचे दीपाला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेले असता दिपाच्या घरच्यांनी मिलिंद समोर एक अट ठेवली . ती अट म्हणजे जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे. त्यांनी ही अट मान्य केली आणि मिलिंद स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले त्यानंतर ते परीक्षाही पास झाले. सरकारी नोकरी लागल्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंद यांना एक मुलगी आहे.

aai kuthe kai karte

Leave a Reply