महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील महत्त्वाचा भाग असलेला ‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा राज्यात नुकताच चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी आपली भूमिका अप्रतिमपणे साकारली आहे.

मुंबईचा कुख्यात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारेने ‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘श्रीमंत कोयाजी बांदल’ यांची भूमिका साकारली आहे. त्याने ती भूमिका अतिशय उत्तमप्रकारे पार पाडली आहे.
अक्षयने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरून “नावाचे बांदल आहोत, आम्ही जिंकत नाय तोवर लढाई संपणार नाय!” असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. अक्षयने ८ मे २०२० रोजी डॅडींची मुलगी योगिता गवळीशी लग्न केले. ‘बिग बॉस’ मराठी ३ या कार्यक्रमातून अक्षय वाघमारे हा पहिला स्पर्धक बाहेर पडला.