बॉक्स ऑफिसवर पुष्पा चित्रपटाला मागे टाकत ‘पावनखिंड’ चा सर्वत्र बोलबाला

0
465
At the box office, Pavankhind was all over the place, beating the movie Pushpa

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल १५०० हून अधिक शो मिळाले.

Pavankhind movie
१८ फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन कमावले आहे. अनेक चित्रपटाच्या गृहात हाऊसफुल्लचा बोर्ड लागले असून नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल १५०० हून अधिक शो मिळाले. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.

Pavankhind
हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर योग्य ती कमाई करण्याच्या प्रतीक्षेत असताना, मराठी चित्रपट उद्योग गेल्या काही महिन्यांत एका पाठोपाठ एक यशस्वी चित्रपटांसह बक्कळ कमाई करताना दिसत आहेत.  झिम्मा, पांडू, झोंबिवली आणि लोच्या झाला रे हे चित्रपट राज्यात हिट ठरले आहेत. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंड पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे.

 

‘पावनखिंड’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 2 कोटींची आणि लगेच तिसऱ्या दिवशी 3 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस दाखवले आहेत. या चित्रपटाच्या ओपनिंग आठवड्याची एकूण कमाई 6 कोटींच्या घरात पोहोचली आहे. या पराक्रमाची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब होत होता. गेल्यावर्षी म्हणजेच 10 जून 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाचा हाहाकार पाहून ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Leave a Reply