औरंगजेबाचे वंशज सध्या झोपडपट्टीत राहतात… धुणीभांडी करतात .?

0
854
aurangzeb history present family where are now Descendants of Aurangzeb pune sons grandson marathitrends

सध्या कुठे आहेत जगावर राज्य करणारे मुगल वंशज ?

कांटो को मत निकाल, चमन से ओ बागबा, ये भी गुलो के साथ पले है, बहार में – बहादूर शाह जफर.
बहादूर शहा जफर ह्यांनी त्यांच्या आयुष्याच्या मावळतीच्या काळात अनेक साहित्य लिहिले. त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यापैकी हा त्यांचा जवळपास शेवटचा शेर आहे. आयुष्यभर ऐशो आराम आणि सत्ता गाजवणाऱ्या एका सम्राटाचे ते दुःख आहे, जे ह्या शेर च्या शब्दातुन व्यक्त होते.

मुगल सल्तनत ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी अन सर्वात ताकतवर सल्तनत पैकी एक सल्तनत होती. इंग्रजांना, मुगलांची ही सल्तनत १८५७ च्या झालेल्या लढ्यानंतर संपुष्टात आणण्यात यश आले. १८५७ च्या लढ्यात हरल्या नंतर मुगलांचे शेवटचे शहंशाह म्हणजेच बहादूर शाह जफर ह्यांचे नंतर काय झाले? इंग्रजांनी त्यांना कशी वागवणूक दिली ? आणि त्यांचे वंशज त्यांचे मुलं ह्यांचे नंतर काय झाले ? इंग्रजांनी त्यांच्या पूर्ण खानदानाला लढाई नंतर लगेचच संपवले की आज ही त्यांच्या वंशजापैकी कोणी जीवंत आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासात अस्पष्टच सापडतात. आज आपण अशाच काही प्रश्नांचा माग घेणार आहोत.

ख्वाजा हसन निजामी ने आपले पुस्तक ‘बेगमांत के आंसू’ मध्ये १८५७ च्या लढ्याच्या शोकांतिका नमूद केल्या आहेत. त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे की १८५८ मध्ये ब्रिटिशांनी जेव्हा मुगल सल्तनत ला पूर्णपणे निस्तेनाबूत केले आणि त्यानंतर दिल्ली वर कब्जा केल्या नंतर त्यांनी बहादूर शाह जफर आणि त्यांच्या पूर्ण खानदानाला लाल किल्ल्याच्या एक छोट्याश्या कोठडीत कैद करून ठेवले होते.

कैद केल्या नंतर लगेच थोड्याच दिवसात बहादूर शाह जफर ह्यांच्या २१ मुलांपैकी १८ मुलांना अत्यंत क्रूर पणे मारून टाकण्यात आले. मारून टाकलेल्या १८ मुलांपैकी ०३ मुलांचे मुंडके दिल्लीच्या खुनी दरवाजा वर लटकवण्यात आले होते, जेणे करून सामन्यां मध्ये ब्रिटिशांची दहशत बसावी आणि पुन्हा कोणीही इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्याची हिम्मत करू नये.

इंग्रज फक्त इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जाऊन ८० वर्षाच्या बहादूर शाह जफर ह्यांच्या वर ही गुन्हा दाखल केला. ४४ दिवस चाललेल्या कार्यवाही नंतर लाचार आणि आजारी असलेल्या बहादूर शाह जफर ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही बातमी जन सामान्यात पसरल्या नंतर ब्रिटिशांना जण आक्रोशाचा सामना करावा लागला , म्हणून त्यांनी त्यांची शिक्षा बदलवून त्यांना ‘देश निकाला’ ची शिक्षा ठोठावली. म्हणजेच आता बहादूर शाह जफर ह्यांना भारत सोडून दुसऱ्या देशात जावे लागणार होते.

त्यांच्या इंग्रजांच्या ह्या क्रूर संहारा नंतर बहादूर शाह जफर ह्यांचे फक्त तीनच मुलं जीवंत राहिले होते. त्या पैकी एक मिर्झा जवान बक्ष , दुसरा मिर्झा शब्बास आणि तिसरा किस्मत बेग असे होते. ह्यांनीच पुढे मुगल वंश पुढे नेला होता.

बहादूर शाह जफर ह्यांनी नंतर त्यांच्या एक पत्नी व दोन मुलांसोबत देश सोडला अन आपले बाकीचे उरलेले आयुष्य ‘बर्मा’ ह्या देशात अतिशय कठीण परिस्थितीत काढले. ते इतके गरीब आजारी व लाचार झाले होते की त्यांना रोजच्या जेवणासाठी ही घरोघरी भीक मागावी लागत होती. सरते शेवटी १८६२ मध्ये आखरी मोगल शासक म्हंटल्या गेलेल्या बहादूर शाह जफर ह्यांचा रंगून इथेच मृत्यू झाला. आपण कधीही भारतात परतणार नाही ह्या अटी वर इंग्रजांनी त्यांच्या दोन मुलांना जीवंत सोडले.

बहादूर शाह जफर ह्यांचे दोघे मुलं आणि नंतर त्यांचा परिवार अजूनही रंगून , बर्मा ह्या देशातच आहेत व ते तिथे अतिशय गरिबीत दिवस काढत आहेत. पण त्याचा पहिला मुलगा जो भारतातच होता त्यांनी नंतर लग्न झाल्यावर एक मुलाला जन्म दिला ज्याचे नाव होते मिर्झा जमशेद बक्ष, नंतर मिर्झा जमशेद बक्ष ह्यांनी नादिरा बेगम ह्यांच्याशी विवाह केला व त्यांना मिर्झा बेदार बक्ष नावाचा एक मुलगा ही झाला.

खूप लहानपणीच मिर्झा बेदार बक्ष हे अनाथ झाले व ते छोटे मोठे काम करत आपले जीवन जगत होते. ह्या कला पर्यंत त्यांनी त्यांची ओळख जगापासून लपवून ठेवली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना त्यांची ओळख कळली आणि भारत सरकार ने त्यांना यथोचित पेन्शन व घर वैगरे दिले. पुढे त्यांनी सुलताना बेगम ह्यांच्याशी निकाह केला ज्या पासून त्यांना सहा मुलं ( पाच मुली आणि एक मुलगा ) झाले. मिर्झा बेदार बक्ष ह्यांच्या निधनानंतर त्यांना मिळणारी पेन्शन ही बंद झाली व त्यांचा परिवार कलकत्या ( कोलकोता ) येथे चहा ची टपरी चालवून आपली जीवन जगत होते. एके काळी हिंदुस्थान चे बादशाह असणाऱ्या खानदानाची अशी वाताहत लागली.

Leave a Reply