‘शेर शिवराज’ मध्ये हा कलाकार साकारणार ‘बहिर्जी नाईक’, चाहत्यांमध्ये नाराजी

0
359
Bahirji Naik will play this actor in sher Shivraj Dissatisfaction among fans

‘शिवराज अष्टक’ सीरिजमधील आजवरच्या सर्व सिनेमांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. यातील प्रत्येक भूमिका चाहत्यांना अगदी आपलेपणात ओढली. मात्र आता ‘शेर शिवराज’ सिनेमातील नव्या भूमिकेची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

SherShivrajMarathiMovie

‘पावनखिंड’च्या घवघवीत यशानंतर आता चाहत्यांना दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा ठरत आहे. दरम्यान या ‘शिवराज अष्टक’ सीरिजमधील आजवरच्या सर्व सिनेमांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. मात्र आता ‘शेर शिवराज’ सिनेमातील नव्या भूमिकेची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांची काहीशी नाराजी व्यक्त केली असून, या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर तसंच सिनेमाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या सिनेमात ‘बहिर्जी नाईकां’ची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा केला आहे. स्वत: दिग्पाल लांजेकर ही भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांनी पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

या पोस्टरवर चाहते दिग्पालच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत, पण त्याचवेळी या भूमिकेत ते हरिश दुधाडे या कलाकाराला मिस करत आहेत. शिवराज अष्टकमधील पहिला सिनेमा ‘फर्जंद’मध्ये अभिनेता प्रसाद ओक याने बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आलेले चित्रपट ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’मध्ये अभिनेता हरिश दुधाडे याने बहिर्जी नाईक साकारले. आता ही भूमिका स्वत: दिग्पाल लांजेकर साकारणार आहे. चाहत्यांना या भूमिकेसाठी हरिश चपखल होता असल्याचे वाटते. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर कमेंट करत याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

हरिश यांचा रोल बदलायला नको होता’, ‘मुव्ही बघण्याचा उत्साह घालवला, पण राजांसाठी पाहावा लागणार’, ‘आधी प्रसाद ओक, मग हरिश आता तुम्ही यामुळे लिंक तुटतेय’, अशा कमेंट्स चिन्मय मांडलेकर याने शेअर केलेल्या पोस्टवर आल्या आहेत.

Leave a Reply