बाहुबलीतील भल्लालदेव देवच्या भूमिकेतून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झालेला अभिनेता राणा डगुबातीने चाहत्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या मैत्रिणीशी अर्थात भावी पत्नी मिहिका बजाजशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. खुद्द राणाने यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

त्याने मिहिकासोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिले – ‘आणि तिने हो’ म्हटले. राणाने मिहिकासोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर शेअर केला आहे.
Guys thank you so much for all the wishes. Humbled with so much love and positivity ?Thank you ❤️ https://t.co/0A1qz5NQBC
— Rana Daggubati (@RanaDaggubati) May 13, 2020
राणाला श्रुति हासन, श्रिया पिळगावकर, तमन्ना, कृती खरबंदा अशा अनेक सेलेब्रिटींनी अभिनंदन केले आहे. अनिल कपूर यांनीही लिहिले- ‘अभिनंदन, माझ्या हैदराबादी मुला. हे तुमच्या दोघांसाठीही खूप चांगले होते.
मिहिका बजाज ‘ड्यूड ड्रॉप डिझाईन स्टुडिओ’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची संस्थापक आहे. ती तिच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर करते.

तसेच राणा दग्गुबाती दक्षिणचा प्रसिद्ध अभिनेता आहे. दम मारो दम, डिपार्टमेंट, ये जवानी है दिवानी, बेबी, द गाझी अॅटॅक आणि हाऊसफुल 4 या हिंदी चित्रपटात हि त्यांनी काम केले आहे.
तशी दक्षिणेत आधीपासूनच त्याची लोकप्रियता होती, परंतु बाहुबलीनंतर त्याला सर्वत्र लोकप्रियता मिळाली. त्याच्या बाहुबली मधील नकारात्मक पात्राचे लोकांनी खूप कौतुक केले.
राणा डग्गुबातीच्या आगामी चित्रपट हाथी मेरे साथी आहे. हा सिनेमा हिंदीव्यतिरिक्त तेलगू आणि तामिळ भाषेतहि बनवला गेलाय. हा चित्रपट 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना विषाणूमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला.
