बिग बॉस 15’च्या विजेत्याचे नाव लीक, हि व्यक्ती ठरणार यंदाच्या पर्वाची विजेती?

0
440
Bigg Boss 15 winner named Leek, will this person be the winner of this years episode

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’ आता शेवटच्या आठवड्यात पोहोचला आहे. यावेळी घरात करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, निशांत भट आणि रश्मी देसाई यांच्यात फिनालयची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यामध्ये विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकतेच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचे नाव समोर आले आहे.

रिअल खबरी या अकाउंटने एक ट्विट करत ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचे नाव लीक केले आहे. रिअल खबरी यांनी केलेल्या ट्विटनुसार, तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉसची विजेती होणार आहे. तर प्रतीक सहजपाल हा यंदाच्या बिग बॉसचा उपविजेता ठरणार आहे. तर करण कुंद्रा आणि शमिता शेट्टी हे दोघांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे.

रिअल खबरी यांनी केलेले हे ट्विट केवळ अंदाज म्हणून करण्यात आले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार हे प्रेक्षकांना रविवारीच समजणार आहे.

 

Leave a Reply