‘बिग बॉस मराठी’ 4 प्रेक्षकांच्या भेटीला येणार लवकर, तयारीला सुरवात झाली !

0
368
Bigg Boss Marathi 4 will meet the audience soon, preparations have started

‘बिग बॉस मराठी’चा पुढील सीझन कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पण आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लवकरच ‘बिग बॉस मराठी’ 4 येत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हिंदी चे १६ वे पर्व नुकतेच संपले. पण आता सर्वांना चाहूल लागली आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची. 15-15 स्पर्धकांवरून सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक सीझन नाही दुसरा सीझन कधी येतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या शोचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या शोच्या पूर्व तयारीला सुरुवात देखील झालेली आहे असे म्हटले जात आहे.

bigg boss marathi logo

एका इंस्टाग्राम पेजने या विषयीची पोस्ट केली असून, अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही या आहे. मात्र, हा शो एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय ‘बिग बॉस मराठी 4’साठी काही जणांना विचारल्याच देखील समोर येत आहे. काही कलाकारांची नावे देखील समोर आलेली आहेत, त्यातील अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर यांची नावे समोर आली आहेत.

Mahesh Manjarekar

सलग तीन वर्ष ‘बिग बॉस मराठी’ च सूत्रसंचालन चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले, मात्र बिग बॉस मराठी’ मार्फत सोपवण्यात आलेला तीन वर्षाचा करार त्यांचा आता संपला आहे. म्हणून आता सूत्रसंचालन कोण करणार? याबद्दलचीच जास्त उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे पुढील सीझन कोण होस्ट करतील ? याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply