भाजप पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात… वाचा नक्की प्रकरण काय आहे ते?

0
363
BJP once again in the midst of controversy ... Read what exactly is the issue

माझी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यासहीत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला.

devendra fadnavis bjp

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्यानंतर 2014-15 मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी देण्यात आली. आर के डब्लू चा पैसा आहे. इकबाल मिर्ची 93 ब्लास्टमध्ये ज्याचा सहभाग होता, त्या ही देणगी देण्यात आली होती. असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केलाय.

devendra fadnavis

पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून 10 कोटी रूपये भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून देण्यात आले. सरकार आल्यानंतर देणगी मिळाली. 20 कोटी रुपये देण्यात आलेत. पण, ही देणगी आहे की खंडणी असा सवाल अनिल गोटे यांनी केला. भारतीय जनता पक्षाला १० कोटींचा ही देणगी की खंडणी (?) दोन वेळा देण्यात आली. अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करते.

मग तोच न्याय फडणवीस यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी ईडीकडे केल्याचेही गोटे यांनी सांगितले. जसं नवाब मलिकांना त्यांनी अतिरेक्यांशी संबंध असलेल्या माणसाकडनं जमीन घेतली म्हणून अटक केली. आता हा तर डायरेक्ट अतिरेक्याशीच संबंध असल्याच मी पुरावा तुम्हाला दाखवोय. इकबाल मिर्ची दाऊदचा राईट हॅन्ड असलेल्या माणसाकडून पैसे घेतलेत नवाब मलिकांना तुम्ही तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक करत असाल तर तुम्ही तर त्याच्याहीपेक्षा मोठे आरोपी आहात.

Leave a Reply