सूर्या स्टारर हिंदी रिमेकमध्ये दिसणार बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार

0
288
Bollywood actor Akshay Kumar will be seen in Surya Starrer Hindi remake

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आणि मुळातच साऊथ चित्रपट बघण्यास आजकाल सर्वजण खूपच उत्सुक असतात. आता सुपरस्टार सुर्या शिवकुमारचा ‘सूरराई पोत्रू’ (Soorarai Pottru) या चित्रपटाचे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक असून दक्षिण भारतातील प्रेक्षकांना प्रभावित केल्यानंतर आता ‘सूरराई पोत्रू’ चित्रपटाचे निर्माते त्याचा हिंदी रिमेक येत आहेत.Soorarai Pottru

एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, असा दावा करत केला जात आहे की अक्षय कुमारला ‘सूरराई पोत्रू’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सुर्याची भूमिका साकरण्यासाठी घेतले जाणार आहे. मात्र, अशी अद्याप अक्षय कुमार किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सोबतच या रिमेकमध्ये अभिनेत्री राधिका मदन अक्षय कुमारसोबत दिसणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

 

सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी पश्चिम भारतात चित्रपटाची मांडणी केली आहे. या चित्रपटात राधिका मदन ग्रामीण मराठी महिलेची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी राधिकाला चित्रपटाच्या फ्लोरवर जाण्यापूर्वी काही मराठी शैलीत बोलणे शिकावे लागेल. या महिन्यात, चित्रपटाचे निर्माते काही कार्यशाळा घेण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच सुरू होईल, असे देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजत आहे.

Leave a Reply