सीरत कपूरचे फॅट टू फिटचे हे दृश्य पाहून तुम्ही होऊन जाल आश्चर्य चकित

0
603
Seerat Kapoor Actress

फिट शरीर मिळविणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण त्यासाठी बरीच मेहनत आणि त्याग करावा लागतो. जर आपल्या मनोरंजन जगाची गोष्ट करावी तर शरीर अगदी फिट असणे आवश्यक आहे. आपले बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचे तारे स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि घाम गाळतात. एकत्रितपणे, ते आवडते अन्नाचे बलिदान देतात आणि डाईट फॉलोव करतात. आलिया भट, अर्जुन कपूर, करीना कपूर सारख्या बर्‍याच कलाकार आणि अभिनेत्रींनी स्वत: ला कॅमेरा अनुकूल करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

Seeart Kapoor

टॉलिवूड अभिनेत्री सीरत कपूरने फिट बॉडी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अचूक आणि संतुलित दिनचर्या पाळत अभिनेत्रीने स्वत: ला तंदुरुस्त ठेवले आहे. ज्यामध्ये पिलाटेस करणे, स्वस्त अन्न ग्रहण करणे, योग्य प्रमाणात पाणी आणि संपूर्ण झोपेचा समावेश आहे. तिच्या चेहऱ्यावरचा चमक न गमावता सीरत कपूरने सुंदर शरीर मिळवलं आहे.
कोविड – १९ च्या महामारी मुले अभिनेत्री घरातच काम करत आहे आणि आपले फिटनेस टिकवण्यासाठी घरगृती व्यायाम करत आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

सीरत तिच्या फॅट टू फिट प्रवासाविषयी बोलताना सीरत म्हणाली, “माझा फिटनेस मंत्र हा एक पौष्टिक प्रमाणात संतुलित जेवण आणि विशिष्ट वेळात पिलाटेसचे सेशन्स आहे. मी आठवड्यातून ईएमएसबरोबर प्रशिक्षण घेते, आणि २० मिनिट चांगला व्यायाम करते. माझ्या फिटनेसच्या प्रवासात माझे ट्रेनर समीर आणि अंजलीचा खूप मोठा हाथ आहे ज्यांनी माझ्या फिटनेस वर खूप मेहनत केली आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी समीरने मला माझ्या शरीर प्रकारानुसार व्यायामाचे प्रकार सांगितले होते ज्याणेंकरून मी घरी पण स्वतःला फिट ठेवून शकते. ह्या व्यतिरिक्त घराची साफसफाईत सुद्धा शरीराचे चांगले व्यायाम होते.”

Bollywood Actress Seerat Kapoor fitness

ह्या दिलेल्या फोटोस मध्ये तुम्ही पाहून शकतात कि सिरतच्या शरीरामध्ये खूप फरक आला आहे. सिरत कपूरने साऊथ सुपर स्टार नागार्जुन, रवी तेजा आणि कित्येक सुपरस्टार सोबत काम केले आहे. सध्या सिरत आपले आगामी चित्रपट “क्रिष्णा एन्ड हिस लीला” आणि “मा विंथा गाढा विनुमा” च्या तैयारीत आहे.

Leave a Reply