अनुष्का नव्या चित्रपटासाठी घेतेयं जबरदस्त मेहनत, व्हिडिओ होतोय व्हायरल

0
395
Chakda Express; Anushka is working hard for a new movie, the video is going viral

बॉलिवूडमध्ये आपल्या उत्तम व उत्कृष्ट अभिनयाने ओळखली जाणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’ च्या तयारीत असून तिचा हा चित्रपट बराच चर्चित आहे.

अनुष्का लग्नानंतर फार कमी चित्रपटांमध्ये झळकली.दिसली. परंतु आता पुन्हा एकदा तिच्या अभिनायची जादू दाखवण्यासाठी ती परत एकदा सज्ज आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ च्या तयारीत मग्न आहे. तिचा हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी याच्या आयुष्यावर आधारीत आहे. यात अनुष्का झुलन गोस्वामीची मुख्य भूमिका साकारणार आहे. याच दरम्यान अनुष्का चित्रपटासाठी क्रिकेटचा जोरदार सराव करताना देखील दिसली.

ChakdaXpress

नुकतेच अनुष्काने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने ब्लॅक रंगाच्या शर्ट, हॅट आणि डेनिममध्ये परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये ती व्यायामापासून बॉलिंग अॅक्शन आणि बॅटिंगपर्यंतचा सराव करत आहे. यातील खास म्हणजे, अनुष्काने क्रिकेटमधील बॉलिंग अॅक्शन शिकण्यावर जास्त भर दिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘गेट-स्वेट-गो! #ChakdaXpress ची तयारी दिवसेंदिवस कठीण होत आहे आणि प्रत्येक दिवशी मेहनत घ्यावी लागत आहे.’ असे लिहिले आहे.

anushka sharma Chakda Xpress

 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक भरभरून कौतुक केले आहे. यात एका युजर्सने क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी पहिल्यांदाच क्रिकेटरची भूमिका साकारणार असल्याने उत्साहित असल्याचे म्हटले आहे. यावरून चाहते अनुष्काच्या आगामी आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) चित्रपटाती आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply