कॉमेडीचा डबल तडका! ‘बच्चन पांडे’चा धमाकेदार ट्रेलर अखेर लाँच…

0
318
Comedy Double Tadaka! Bachchan Pandey's smash hit trailer finally launched ...

‘बच्चन पांडे’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अक्षय मात्र एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सर्वांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता लागली आहे.

Bachchan Pandey Akshay Kumar

बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार. अक्षय हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. अक्षय नेहमीच त्याच्या स्टंटबाजीमुळे चर्चेत असतो. नुकताच आता त्याचा पण ‘बच्चन पांडे’ या आगामी तसेत बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत चर्चेचा विषय बनत आहे.

चित्रपटाता ट्रेलरच इतका हार्ड आहे की सर्वांची उत्सुकता अधिक वाढली आहे. या ट्रेलरची सुरुवात मायरा देवेकरने होते. मायराला बच्चन पांडे नावाच्या गॅंगस्टरवर चित्रपट तयार करायचा असतो आणि यात तिचा मित्र विशू तिची मदत करतो. तर बच्चन पांडे हा एक क्रुक गॅंगस्टर असतो. जेव्हा मायराला कळते की बच्चन पांडेने त्याच्या स्वत: च्या गर्लफ्रेंडचा खून केला आहे. तेव्हा तो तिचा खून करण्याचा निर्णय घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता नक्की हा चित्रपट कसा असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ३ मिनिटाच्या आणि अक्षय च्या या धमाकेदार एंट्रीमुळे सर्व जण आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत.

बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर मायरा ही भूमिका क्रिती सेनन साकारत आहे.ही दोघं या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतील.

बच्चन पांडे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून चित्रपटाची कथा निश्चय कुट्टांडा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मित साजिद नाडियाडवालाने केली आहे. तर, हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट जिगरथंडाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. शिवाय हा चित्रपट १८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply