महेश मांजरेकरांविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल; तात्काळ कारवाईची मागणी

0
324

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा चित्रपट ‘वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटांमध्ये महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्यामुळे याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पॉस्को न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mahesh Manjarekar

या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने महेश मांजरेकर यांच्याविरोधात चित्रपटातील दृष्या संदर्भात तपास करण्याचे आदेश माहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.ट्रेलरमध्ये अनेक लैंगिक दृश्ये, हिंसक दृश्ये आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यही दाखविली आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतला आहे.इतकेच नाही तर याविरोधात केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचे ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सीमा देशपांडे यांनी त्यांचे वकील ऍड. प्रकाश सालसिंगकर यांच्यामार्फत याप्रकरणी न्यायालयात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीवरून विशेष न्यायमुर्ती एस. एन. शेख यांनी माहिम पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे वकील प्रकाश सालसिंगीकर
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्यासह या चित्रपटात काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार या सर्वांवर आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी दाखल केली आहे. तक्रारीबाबत मुंबई पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यानं तक्रारदारांनी कोर्टात याचिका केली आहे.

Leave a Reply