आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, स्टेडियममध्ये 50 टक्के उपस्थितीची सक्ती

0
373
Corona's inclusion in the IPL, forcing a 50 per cent attendance at the stadium

गेल्या दोन वर्षात जे घडू शकलं नाही ते यंदाच्या वर्षी सोयीनुसार करण्यात आले होते. पण ज्याची भीती होती तेच मात्र झालं. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत यशस्वीरित्या 9 सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या 15 व्या मोसमात सर्व खबरदारी घेतली आहे. त्यानंतर कोरोनाचा ओसरता जोर पाहता स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 25 टक्के चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

tata-ipl-stadium

राज्य सरकारने कोरोना नियम शिथिल केल्याने 6 एप्रिलपासून स्टेडियममध्ये 50 टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र ज्याची भिती होती अखेर तेच झालं. आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून पुन्हा आयपीलवर निर्बंध लावण्यात आले आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला कोरोना झाला आहे, त्यांनी हि माहिती आपल्या अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे.

tata ipl

ट्विटमध्ये काय लिहले आहे ते मराठी मध्ये वाचा – (Aakash Chopra)

“जवळपास कोरोनाला 2 वर्ष सहन केल्यानंतर अखेर मी ही त्याच्या कचाट्यात सापडलो आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. लवकरच यातून सावरेन”, असा आशावाद आकाशने या ट्विटमधून व्यक्त केला आहे. आकाशने कोरोनातून लवकरात लवकर सावरावं यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

Leave a Reply