इस्लामिक दहशतवाद दाखवल्यामुळे थलपथी विजयच्या ‘Beast’ वर ‘या’ देशात आवाज उठवला गेला

0
396

दाक्षिणात्य सिनेमे सध्या बहुचर्चित आहे. त्यात थलपथी विजयचा ‘बीस्ट चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता विजय थलपथी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयचे लाखो चाहते आहे. सध्या विजयच्या ‘बीस्ट’ Beast या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपट प्रदर्शनापूर्वीच काही बंधनं समोर येताना दिसणार आहे. कारण याच काळात बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’ आणि ‘Jersey’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, आता विजयच्या या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
vijay telgu actor
चित्रपटावर बंदी आणण्याचे कारण हे त्यात दाखवण्यात आलेल्या इस्लामिक टेररिझम सीन आहे, असे म्हटले जात आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजसमोर अडचणी येऊ शकतात. पण चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली नाही, तर ही बंदी कुवेतमध्ये घालण्यात आली आहे. कुवेत सरकारने हे देशाच्या हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कुवेतने दिलकीर सलमानच्या ‘कुरूप’ आणि विष्णू विशालच्या ‘एफआयआर’ या चित्रपटावरही बंदी घातली होती. मात्र आता या चित्रपटावर बंदी घालण्यात येणार असे समोर आले आहे.

super star vijay

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात विजय दहशतवाद्यांशी लढत आहे , त्यामुळे असे ढासू सिन पाहून चित्रपटासाठी लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली. ट्रेलरमध्ये विजय एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे, जो चेन्नईच्या मॉलमध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवतो. विजयची ही भूमिका लोकांना खूप आवडली. या चित्रपटात दाखवण्यात आलेली ही दहशतवादी दृश्ये पाहून कुवेतमध्ये त्यावर बंदी घालण्याची चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतील ट्रॅकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोबाला विजयबालन यांनीही याप्रकरणी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, “कुवेत सरकारने विजयच्या ‘बीस्टवर बंदी घातली.” दरम्यान हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply