‘वहिनीसाहेब’ पुनरागमनासाठी सज्ज, लवकरच प्रदर्शित होणार नवी मालिका

0
390
Dhanashri Kadgaonkar Vahinisaheb ready for return, new series to be released soon

‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरीहि या मालिकेतील सर्वच कलाकार आजही सोशल मीडियातून चाहत्यांना भेटतअसतात. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रानादा ची वहिनीसाहेब म्हणजे धनश्री काडगावकर हिच्या बाबत आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. तिच्या वहिनीसाहेब या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा धनश्री नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत बराच काळ तिने काम केलं. पण गरोदरपणामध्ये तिने मालिकेमधून ब्रेक घेतला. स्वतःसाठी वेळ तिने घेतला. त्यांनतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता आईच्या भूमिकेनंतर ती पुन्हा झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेमध्ये ती काम करताना दिसणार आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटव्दारे मालिकेचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती दिली.

kadgaonkar_dhanashri
‘तू चाल पुढं’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करत धनश्रीने म्हटलं की, “तू चाल पुढं’ तुला गं सखे साथ तुझ्या आत्मविश्वासाची…गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची…नवी मालिका ‘तू चाल पुढं’ १५ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७. ३० वाजता.” या मालिकेमध्ये धनश्री नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे.अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दिपा चौधरी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसेल.

Leave a Reply