स्वीटुसोबत दिसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? ‘

0
370
Did you recognize the Ya actress who appeared with Sweetu

येऊ कशी तशी मी नांदायला फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने तिची बेस्ट फ्रेंड मधुरा गोडबोलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर. या मालिकेत अन्विताने स्वीटूची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या मालिकेमुळे अन्विताला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे तिचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

याशिवाय अन्विता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अन्विता अनेकदा तिच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा असाच एक फोटो सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अन्विताने इन्स्टाग्रामवर एका मैत्रिणीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत तिच्यासोबत असलेली मुलगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अन्विताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अभिनेत्री मधुरा गोडबोलेसोबत दिसत आहे. मधुरा आणि अन्विता यांची खूप जुनी मैत्री आहे आणि अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

तसेच, अलीकडच्या काळात मधुराची कलाविश्वातील उपस्थिती कमी झाली आहे. मात्र, ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मधुराने अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply