मृणाल कुलकर्णींच्या होणाऱ्या सुनबाईला पाहिलंत का?

0
400
Did you see Mrinal Kulkarni's upcoming Sunbai

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस अखेर अधिकृतरित्या एन्गेज्ड झाले आहे. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. शिवानी आणि विराजस दोघांनीही साखरपुड्याचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

एकंदर काय तर आता मृणाल कुलकर्णी सासूबाई होणार आहेत. एका मुलाखतीत मृणाल यांनी सून कशी हवी? हे सांगितलं होतं. शिवानी अगदी तशीच आहे. माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. फक्त ती विराजसला पूरक हवी. ती सून म्हणून नव्हे तर त्याची मैत्रिण म्हणून आमच्या घरात यावी. त्याच्या निवडीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं मृणाल म्हणाल्या होत्या. निश्चितपणे शिवानी या अपेक्षांवर खरी उतरणारी आहे.

विराजसची ती चांगली मैत्रिण आहे. प्रेमात पडल्यावर त्यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवलं नाही. कधी मालिकांच्या सेटवर तर कधी मित्र-मंडळींसोबत एकत्र धम्माल करताना ते दिसायचे. शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत शेवटची दिसली होती. तर विराजस ‘माझा होशील’ ना या मालिकेत शेवटचा दिसला होता. बनमस्का मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.

shivani rangole weds virajas kulkarni

‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा ’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले आहे.

Leave a Reply