‘तुला हिंदी येते का?’ या प्रश्नावर तिनं दिलं हे उत्तर, पाहा काय म्हणाली समंथा?

0
365
'Do you know Hindi' The answer she gave to this question, see what Samantha said

साऊथची गाणी असूद्यात किंवा तिथल्या सिनेसृष्टीतील अभिनेता व अभिनेत्री, ते आजही साऊथप्रमाणे बॅालिवूडमध्ये फेमस आहेत. त्यात साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुष्पा या चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या गाण्यामुळे तीला जास्तच लोकप्रियता मिळाली. झाली आहे. आज देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ही अभिनेत्री एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीला एका पापराझीने तुला हिंदी येतं का? असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिलं तुम्हीच वाचा.

नुकतंच अभिनेत्रीला पापाराझींनी एयरपोर्टवर स्पॉट केलं होतं. यादरम्यान अभिनेत्रीला आपल्या चाहत्यावर्गातील दोन मुलींसोबत सेल्फी देताना, तिला आपल्या कॅमेरातसुद्धा कैद केलं.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री आपल्या चाहत्यांना सेल्फी देताना दिसत आहे. त्यादरम्यान तिला हा प्रश्न विचारण्यात आला. त्याचवेळी एक पापराझी समंथाला प्रश्न विचारत म्हणतो, ‘मॅम तुम्हाला हिंदी येतं का?’ यावर समंथा हसू लागते. आणि गोड उत्तर देत म्हणते हो थोडं थोडं येतं’. त्या व्हिडिओत एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे, ‘किती गोड आहेस’. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘किती शांत स्वभाव आहे’. तर एकाने असंही लिहिलंय, ‘बॉलिवूड प्रोजेक्ट येत आहे का?’

'Do you know Hindi Samantha
समंथा रूथ प्रभू ही अभिनेत्री नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटामुळेसुद्धा चर्चेत आली होती. या दोघांच्या चाहत्यांना या गोष्टीचा धक्का बसला होता. अभिनेत्री सध्या आपल्या करिअरवर लक्ष देत असून , ती लवकरच शाकुंतलम या चित्रपटात दिसेल.
samantharuthprabhu

Leave a Reply