अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची ‘ही’ हटके गोष्ट तुम्हाला माहित आहे का?

0
401
Do you know the weird story of Arijit Singh's second marriage

बॉलिवूडमध्ये सुरेल आवाजाचा बादशाह म्हणून गायक अरिजित सिंगकडे पाहिले जातं. “जिया जाये ना ,तुम ही हो ,छन्ना मेरेया”, यांसारखी अनेक हिट गाणी देत त्याने अवघ्या १५ ते १६ वर्षात बॉलिवूडमध्ये यशस्वी सिंगर म्ह्णून स्वतःचे स्थान पक्के केले. तो तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला ते ‘आशिकी २’ चित्रपटामधील सुप्रसिद्ध गाण्यांमुळे! आज याच आवडत्या गायकाचा वाढदिवस.यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या वैवाहिक जीवनातील हटके गोष्ट.

Arijit Singh second marriage
अरिजीत सार्वजनिक ठिकाणी त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार क्वचित बोलतो. फार कमी लोकांना माहित आहे की, अरिजीतची दोन लग्न झाली आहेत. अरिजीतची २०१३ मध्ये ‘फेम गुरुकुल’ या रिअ‍ॅॅलिटी शोदरम्यान स्पर्धक असलेल्या रूपरेखा बॅनर्जीसोबत पहिली भेट झाली होती. तिथेच त्यांचे सूत जुळले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनतर त्यांनी त्याच वर्षी म्हणजे २०१३ मध्ये लग्न केलं. मात्र कालांतराने त्यांच्या मतभेद होऊ लागले आणि हे लग्न टिकू शकले नाही. आणि ते दोघे वेगळे झाले.

story of Arijit Singh second marriage

त्यांनतर अरिजीतने त्याची बालपणीची मैत्रिण कोयल रॉयसोबत दुसरं लग्न केलं. कोयल घटस्फोटित आणि एका मुलाची आई असतानाही अरिजीतने तिला स्वीकारलं. प्रेम हे बिनशर्त आणि निरपेक्ष असते हे त्याने जगाला दाखवून दिलं. खरतर कोयल व अरिजीत बालपणापासूनचे एकमेकांना ओळखत होते. त्यांचे प्रेमही होते. मात्र काही कारणास्तव दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. दरम्यान, कोयलने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्याच्यापासून कोयलला एक मुलगा होता. पण कोयलचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते. शेवटी कोयलने पहिल्या पतीला घटस्फोट देत अरिजीतसोबत दुसरा संसार थाटला. कोयल व अरिजीत दोघेही आनंदात आहेत.

HD-wallpaper-arjith-singh-bollywood-singer

अरिजीत सिंहची कारकीर्द

२००५ मध्ये सोनी टीव्हीतर्फे ‘फेम गुरुकुल’ हा रिअॅलिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अरिजितने भाग घेतला होता. या शो मध्ये अरिजित शेवटची फेरी गाठू शकला नाही पण टीव्हीमध्ये आल्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग वाढली. या कार्यक्रमामधूनच त्याच्याकारकिदीर्ला सुरुवात झाली. या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला संधी दिली होती. ‘सावरियाँ’ या चित्रपटातील एक गाणं त्याने गायलं होतं. मात्र काही कारणास्तव हे गाणं प्रदर्शित झालं नाही. मात्र यानंतर अरिजीतने कधीच मागे वळून बघितले नाही. त्याला कामं मिळत गेली. आज अरिजीत एक गायक, संगीतकार म्हणून लोकप्रिय आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.

Leave a Reply