रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा असाआहे संघर्षात्मक प्रवास

0
497
Eknath Shinde's journey from rickshaw puller to Chief Minister of Maharashtra has been a struggle

एकनाथ शिंदेंचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये झाला. एकनाथ शिंदे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झालं आहे. ठाण्यात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. ते शहरामधील वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवता चालवता शिंदेयांचा ८०च्या दशकात शिवसेनेशी जोडले गेले. सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांच्या राजनैतिक प्रवास सुरु झाला.

ठाण्यामधील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्वांमध्ये एकनाथ शिंदेंची गणती केली जाते. लोकसभा आणि नगरपालिका निवडणुकामध्ये जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंची साथ मिळणे गरजेचे असल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून काम केलं आहे. ठाण्यामधील दिग्गज नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत ते नेहमीच राहिले आहेत.

एकनाथ शिंदे १९९७ मध्ये ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१मध्ये पालिका सभागृहामधील विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा २००२ मध्ये ते पुन्हा नगरसेवक निवडून आले. याशिवाय ३ वर्षे ते स्थायी समितीचे सदस्य राहिले. दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर २ वर्षांनंतरच म्हणजे २००४ साली ते ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

It was decided on this day that Eknath Shinde will become the Chief Minister!

२००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंचं पक्षात वजन वाढले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील स्थान खूपच मजबूत झालं व ते ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे मानले जाऊ लागले. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर २००९ , २०१४ व २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून गेले. एवढाच नाही तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा मतदारसंघामधून खासदार झाले.

एकनाथ शिंदेनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते चौथ्यांदा आमदार झाले. शिवसेना आणि भाजपने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती. रिक्षाचालक ते नगरसेवक-आमदार आणि मंत्री ते आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदेंचा प्रवास चकित करणारा आहे.

Leave a Reply