हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला…शरद पोंक्षेंची पोस्ट सध्या चर्चेत रंगली

0
374
Eknath Shinde's phone ring in the hospital Sharad Ponkshe's post is currently in the news

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर काही वादविवाद लावले जात आहेत. अनेक लोकांचा एकनाथ शिंदेंच्या या बंडाला पाठिंबा आहे. तर अनेक लोक त्याच्या विरोधामध्ये आहे. यासर्वमध्ये मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Eknath Shinde

शरद पोंक्षें यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शरद पोंक्षे यांच दुसरं वादळ हे पुस्तक दिसतं असून त्याच्या पाठीमागे शरद पोंक्षें व एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये पुश्प गुच्छ दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

sharad pawar news

पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यामध्ये सविस्तर लिहिलंय आहे. दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात एका झुंजीची गाथा शरद पोंक्षे दोन महिन्यात दुसरी आवृत्ती

Eknath Shinde news

सोशल मीडियावर काहीजणांनी यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा आणि विरोध दाखवत आहेत. तसेच मराठी अभिनेता जे हिंदुत्ववादी आहेत. सावरकरांच्या विचारांचे विश्वासू सेवक आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपाचे समर्थक आहेत असं वाटू लागलंय त्या शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा देणारी एक पोस्ट केलेली आहे. ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

Leave a Reply