जेल मध्ये जाऊन आली तरी थेरगाव क्वीनचा माज काही उतरेना, पहा हा व्हिडीओ!

0
484
Even after going to jail, Thergaon Queen madness did not come down, watch this video

बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर थेरगाव क्वीन ची चर्चा जरा जास्तच रंगली आहे.अर्थात थेरगाव क्वीन म्हणजे थेरगाव क्वीन इंस्टाग्रामवर असलेली साक्षी महाले. थेरगाव क्वीन’ हीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स असून, इंस्टाग्राम रील्समध्ये शिव्या देत असल्याने या थेरगाव क्वीनला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले गेले आहे.

thergaon_queen_

इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी हि तरुणी अश्लील भाषेचा वापर करायची. तिचे इंस्टाग्रामवर बनवलेले शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्याचे व्हिडीओ चांगलेच व्हयरल झाले होते. या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. मात्र या व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. व या थेरगाव क्वीनला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. तसेच तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.

त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडून दिले होते. तसेच तिचा मित्र कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी देखील मागितली. कारण तिचा हा मित्र देखील या विडिओ मध्ये शामिल होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही धडा शिकवत, माफी मागायला लावली. त्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले. मात्र जेलची हवा खावून देखील ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती अजून उतरलेली दिसत नाहीये. तरुणी पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिनं आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. पोलिसांनी तिला अटक केली होती त्याचा व्हिडिओ बनवून तिनं इंस्टाग्राम रीलला टाकला आहे. आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाला आहे.

thergaonqueen

Leave a Reply