“फार अस्वस्थ होतं” आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीच्या पोस्टमुळे खळबळ

0
357
Excitement over Arundhati's post in Very Uncomfortable serial aai kuthe kay karte

सध्या टीआरपीमध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरची एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे ती अरुंधतीच्या व्यक्तिरेखेमुळे! स्वतंत्र विचारधारा घेऊन जगणारी अरुंधती कुटुंबालाही प्राधान्य देत आहे. अरुंधतीचा एक गृहिणी ते यशस्वी गायिका बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना भावला आहे.

 

अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती नेहमी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गंमतीजंमतीबाबत पोस्ट करत असते. नुकतीच तिने जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. जी प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने “फार अस्वस्थ होतं ” असे विधान केले आहे.

aai kuthe kay karte Madhurani Prabhulkar

काय आहे पोस्टमध्ये?

अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टद्वारे तिचा सेटवर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यात तिने कॅप्शनमध्ये पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले आहे. ” मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं , भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं…. वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक , मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात … तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची…. जमेल तसं…दोन पानं कधी चार . पण वाचायचं…वाचत राहायचं. असे म्हणत तिने जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने पोस्टमध्ये ती सध्या वाचत असलेली पुस्तकं १. मंद्र . भैरप्पा २. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने ३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख, आदींचा उल्लेख केला आहे, शेवटी तिने तिच्या फॉलॉव्हर्स ला तुम्ही काय वाचताय???असा प्रश्नही पोस्टमध्ये केला आहे.

Leave a Reply