झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली आहे. मालिकेतील श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांसोबत परी मुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे, की या मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी या मालिकेतून एक्झिट झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांनी जगन्नाथ चौधरी हे पात्र साकारलं असून, त्यांनी साकारलेली यशच्या आजोबांची भूमिका चांगलीच चर्चेत आली होती. मात्र त्यांनी नुकतीच या मालिकेतून एक्झीट झाली आहे.

गेल्या अनेक भागांमध्ये मोहन जोशी हे या मालिकेत पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी या मालिकेतून का एक्झिट घेतल्याच्या अनेक चर्चा समोर आल्या होत्या. मात्र नुकतंच यावर एक बातमी समोर आली आहे. मराठी सिरिअल या इन्स्टाग्राम पेजने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान मोहन जोशी यांची ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर साकारणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
