फडणवीस आमच्या प्रकरणामध्ये पडू नका ! संजय राऊत यांचा इशारा..

0
343
Fadnavis don't fall into our case Sanjay Raut's warning

राज्यात राजकीय उलथापालथला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सरळ भाजपला इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सूत्र हलवित आहेत. मुंबई – दिल्ली वारी सतत करत आहेत. अशी जबरदास्त चर्चा सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. फडवणीस तुम्ही या प्रकरणामध्ये पडू नका नाही तर पहाटेचा शपथविधी संध्याकाळी होईल. असे संजय राऊत म्हणाले.

Hints given by Sanjay Raut Shiv Sena is now ready to fight a legal battle

जे काही सुरु आहे त्याला तोंड द्यायला शिवसेने सक्षम आहे. शिवसेनेसाठी सर्वानीच बलिदान दिले आहे. आमचे आम्ही बघून. देवेंद्र फडणवीस तुम्ही या प्रकरणामध्ये पडू नका. स्वत:ची उरलीसुरलेली सन्मान धुळीस मिळवू नका, असा महत्वाचा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. संजय राऊत हे मीडियाशी बोलत होते. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे, त्या घडामोडीवर राऊत बोलत होते.

uddhav thackeray

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या मागे हजारो शिवसैनिक आहेत म्हणून मी उभा आहे. तसच आज उद्धव ठाकरे यांच्या मागे हजारो सैनिक उभे आहेत. पक्षवाढीसाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. पैसा असले म्हणून कुणीही काही करु शकत नाही. संजय राऊत यांनी भाजपला चांगलच सुनावले आहे. जे बाहेर गेलेत त्यांनी मुंबईमध्ये येऊन बोलावे. त्यांना जी सुरक्षा आमदार म्हणून आहे. जे कोणी आमदार ढुंगणाला पाय लावून पळाले आहेत. त्याची सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. वाघ म्हणवता मग बकरीसारखे का वागता? असा शब्दमध्ये हल्लाबोल राऊत यांनी केला. शिवसेनेच्या पाठिशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. शिवसेनेचा अजून विसेफोट झालेला नाही. पक्षामध्ये काही भेटी केल्या जातील, असे संकेत संजय राऊत यांनी यावेळी दिली.

Leave a Reply