फरहान अख्तर शिबानी दांडेकर मराठमोळ्या पद्धतीने अडकणार विवाहबंधनात..

0
398
Farhan Akhtar Shibani Dandekar will get involved in marriage with Marathmolya method

फरहान अख्तर शिबानी दांडेकर मराठमोळ्या पद्धतीने अडकणार विवाहबंधनात, या ठिकाणी पार पडणार शाही विवाह सोहळा

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा 21 फेब्रुवारीला सिविल सेरेमनी होणार आहे.दोघेही शनिवारी फरहान अख्तरच्या खंडाळा फार्म हाऊसवर विवाहबद्ध होणार आहेत. दोघेही आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात कमी पडत नाहीत. दोघेही अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Farhan Akhtar Shibani Dandekar love

या दोघांचे लग्न अतिशय खाजगी असेल, ज्यामध्ये फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असेल. दोघेही 21 तारखेला लग्न करणार आहे. परंतु ते करण्यापूर्वी फरहान अख्तरच्या फार्म हाऊसवर 19 फेब्रुवारीला मराठी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकारे घटनास्थळी पोहोचू नये, अशी त्यांची इच्छा आहे. या दोघांच्या लग्नाची निमंत्रणे फक्त त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांना पाठवण्यात आले आहे.लग्न रात्री ऐवजी दिवसा होण्याची शक्यता जास्त आहे.

Farhan Akhtar Shibani Dandekar

पण आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर नागरी सोहळ्यापूर्वी दोघेही महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार विवाहबंधनात अडकणार आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाचे फंक्शन कसे पार पडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिबानी दांडेकरची बहीण अनुषा दांडेकर आणि तिच्या जवळच्या मैत्रिणींनी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बॅचलर पार्टी आणि प्री-वेडिंग फंक्शन्सची जबाबदारी खांद्यावर घेतल्याचे वृत्त आहे.लग्नानंतर दोघेही मित्र आणि सहकाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवू शकतात.

Leave a Reply