बीस्ट चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी निर्माते दिग्दर्शकांमध्ये चढाओढ

0
414
Fight among producers-directors for Hindi remake of Beast movie

सध्या साऊथमधील अनेक चित्रपटाचे हिंदी रिमेक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटांना तुफान प्रतिसाद देतात. यामध्येच आता साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचा आगामी ‘बीस्ट’ हा चित्रपट घोषणेपासून कमालीचा चर्चेत आहे. आता या चित्रपटाची हिंदी रिमेकमध्ये डबिंग करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘बीस्ट’ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. बीस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करीत आहेत. त्यांनी स्वत: चित्रपटाची कथाही लिहिली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे विजयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची मागणी वाढली असून, त्यासाठी अनेक बडे दिग्दर्शक निर्माते पुढे सरसावले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक चित्रपटांचे रिमेक बनले आहेत, जे अनेक बड्या दिग्दर्शकांनी विकत घेतले आहेत. आता बीस्ट चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क कोण विकत घेणार. यामध्ये कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

Leave a Reply